Swapnil Kusale won Bronze in Olympic 2024 : स्वप्नील कुसाळे याची क्रीडा कामगिरी ही भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याच्यासारखीच आहे. तर तो नेमबाज अभिनव बिंद्रा याचा चाहता असून त्याच्यापासून प्रेरणा घेतच त्यांनीही कामगिरी केली आहे. महेंद्रसिंग धोनी हा एका छोट्या गावातून पुढे आला आणि तेथे त्यांनी क्रिकेटमध्ये केलेली कामगिरी जागतिक पातळीवर गौरवली गेली. तसंच स्वप्निल कुसाळे हा हजार लोकवस्तीच्या कांबळवाडीत शिकला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हे ही वाचा… Swapnil Kusale Won Bronze : स्वप्नीलने नववीत असताना पाहिले होते ऑलिम्पिक पदकाचे स्वप्न

खरे तर त्याच्या घरामध्ये नेमबाजीची अशी कोणतीच परंपरा नव्हती. तरीही स्वप्नीलला या खेळात आवड निर्माण झाली. यातूनच नववीला त्याने पुढील प्रशिक्षण घेण्यासाठी नाशिक गाठले. यावेळी त्याचं वय अवघे १५ वर्ष होतं. याच वेळी त्याला ऑलम्पिकचे वेध लागले होते. पुढे त्याने दहावी पूर्ण केली. सकाळी आणि संध्याकाळी तो तेथे सराव करायचा. त्यानंतर दुपारी शाळेला जात होता. त्यानंतर अभिनव बिंद्राला २००८च्या ऑलिम्पिकमध्ये खेळताना पाहण्यासाठी स्वप्नीलने पही. नेमबाजीच्या या वेडापायी त्याने बारावीवीच्या परिक्षांकडे कानाडोळा केला होता. त्यानंतर त्याचे अवघे आयुष्य निंबाजीतच गुंतून राहिले इतके की त्याचा नेम आता पॅरिस ऑलिंपिकच्या कांस्यपदावर बसला आहे.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A kolhapur boy swapnil kusale fan of abhinav bindra asj