कोल्हापूर : कुस्ती हे कोल्हापूरचे खास वैशिष्ट्य! या कुस्तीचाच वापर करीत शनिवारी सकल मराठा समाजाच्या वतीने एक अनोखे आंदोलन करण्यात आले. मराठा समाजाबाबत वादग्रस्त वक्तव्य करणारे माजी आमदार प्रकाश शेंडगे यांचा मुखवटा असलेल्या मल्लाला यावेळी चितपट करण्यात आले. ओबीसी मध्ये आरक्षण हवे असेल तर मराठा समाजाने दहा वर्षे लंगोटा लावून राहिले पाहिजे असे विधान प्रकाश शेंडगे यांनी केले होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : “खिद्रापूर – जुगुळ आंतरराज्य रस्ता काम सुरू करा; अन्यथा अन्नत्याग”, उत्तम सागर मुनी महाराज यांचा इशारा

त्याचे राज्यातील सकल मराठा समाजात तीव्र पडसाद उमटले. या विधानाचा निषेध करण्यासाठी येथील दसरा चौकात अनोखे आंदोलन करण्यात आले. शेंडगे यांचा मुखवटा असलेल्या मल्लाची कुस्ती लावण्यात आली. त्याला मराठा मल्लांने हरवले. ही कुस्ती जिंकल्यावर उपस्थितांनाही टाळ्यांच्या गजरात स्वागत केले. यावेळी मंत्री छगन भुजबळ, प्रकाश शेंडगे यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. वसंतराव मुळीक, बाबा इंदुलकर, विजय देवणे, बाबा पार्टे, दिलीप देसाई यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In kolhapur maratha wrestler put face mask of obc leader prakash shendge for wrestling css