कोल्हापूर : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने अटक केली आहे. याविरोधात आम आदमी पार्टीने आज कोल्हापुरात एक दिवसीय सामूहिक उपोषण करून केजरीवालांना पाठिंबा व्यक्त केला.

हेही वाचा – कोल्हापुरात प्रचाराचा धुरळा; हातकणंगलेत वारे थंडच

हेही वाचा – धैर्यशील माने – राजू शेट्टी दोघांचाही बदलता राजकीय प्रवास

केजरीवालांच्या अटकेने देशभरात जनक्षोभ उसळला आहे. आप पक्षाने आज देशभरात सामूहिक उपोषणाचे आयोजन करून केजरीवालांना पाठिंबा व्यक्त केला. ईडीकडून कोणतेही सबळ पुरावे न दिल्याने आप खासदार संजय सिंह यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. अशाच पद्धतीने बाकीच्या नेत्यांना देखील केवळ राजकीय सूडबुद्धीने अटक केली असून गुन्हा सिद्ध करताना ईडी तोंडावर पडणार असल्याचे आप पक्षाचे प्रदेश संघटन सचिव संदीप देसाई म्हणाले. यापूर्वी आक्रमक पवित्रा घेत आंदोलने केली होती. भाजप कार्यालयावर मोर्चा काढण्याचा प्रयत्न केल्याने कार्यकर्त्यांना अटक झाली होती. ईडीची प्रतिकात्मक होळी पेटवून निषेध नोंदवण्यात आला होता. तसेच केजरीवालांच्या समर्थनार्थ पक्षाने रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. यावेळी शहराध्यक्ष उत्तम पाटील, किरण साळोखे, सूरज सुर्वे, अभिजित कांबळे, दुष्यंत माने, आदी उपस्थित होते.