कोल्हापूर : शहरात आज सकाळी ‘मोदी हटाव, देश बचाव’ या आशयाचे बॅनर लावण्यात आले आहेत. अनेक ठिकाणी लागलेले हे बॅनर सकाळी फिरायला गेलेल्या काही नागरिकांनी फोटो काढून सोशल मीडियावर टाकल्याने हे बॅनर चर्चेचा विषय बनलेले आहे.
बॅनर कोणी लावले याबाबत माहिती मिळाली नसली तरी दिल्लीत ‘आप’ने लावलेल्या बॅनर सारखे दिसणारे हे बॅनर असल्याचे समजते.तथापि,रोख मात्र कोल्हापुरातील ‘आप’कडे जात असल्याची चर्चा आहे.
हेही वाचा >>> यवतमाळच्या ‘आरटीओ’ अधिकाऱ्यालाही अडीच कोटी मागितले? दोन्ही लाचखोरांच्या संभाषणाचा तपशील समोर
देशात राष्ट्रीय पातळीवर सुरू असलेल्या घडामोडी, अडाणी समूहाच्या कथित घोटाळ्यामुळे संसदेत सुरू असलेला गदारोळ, राहुल गांधी यांची खासदारकी तडकाफडकीने रद्द केल्याचे प्रकरण ताजे असतानाच अशा आशयाचे बॅनर कोल्हापुरात लागल्याने खळबळ उडाली आहे.
मोदी हटाव देश बचाव हे पोस्टर कोल्हापूर मध्ये खालील ठिकाणी लागले आहेत
जनता बाजार चौक
गोकुळ हॉटेल शेजारी शेजारी
क्रशर चौक
सदर बाजार चौक
माऊली चौक
हॉकी स्टेडियम चौक
रंकाळा टॉवर पार्वती टॉकीज