देशातील काँग्रेसची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा करण्यापेक्षा काँग्रेस जोडोचे काम करावे, असा टोला भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्त्या शायना एन. सी. यांनी येथे शनिवारी लगावला.पत्रकार परिषद बोलताना त्या म्हणाल्या, भारत जोडो यात्रा ही परिवार जोडो यात्रा आहे. मतदार हे जाणून असल्यामुळे दिवसेंदिवस भाजपच्या जनाधार वाढत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>>कोल्हापुरात जिल्हाध्यक्षांच्या बंडाने राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का; शिंदे गटाकडे वाटचाल

राज्यातील औद्योगिक प्रकल्प गुजरात कडे वळत असल्याकडे लक्ष वेधले असता त्या म्हणाल्या, महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातमध्ये न्यायचे की अन्य कोठे हे सर्व उद्योगपतींनी ठरवायचे असते. याला सत्ताधारी लोक जबाबदार नाहीत असा निर्वाळा त्यांनी राज्यातील राज्य सरकारच्या बाजूने दिला.जायन्ट्स समूहाच्या विश्वाध्यक्षा शायना एन.सी यांनी येथील जायन्ट्स ग्रुपना भेट दिली. त्यावेळी त्या म्हणाल्या , जायन्ट्स समूहाच्यावतीने आम्ही समाजातील उपेक्षितांसाठी काम करत आलेलो आहे. जायन्ट्सचे प्रमुख गिरीश चितळे, भाजपचे जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे उपस्थित होते.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: National spokesperson shaina nc criticizes rahul gandhi over bharat jodo yatra amy