कोल्हापूर :  कोल्हापूर शहरासह जिल्ह्याला बुधवारी मुसळधार पाऊस पडला. शिये येथे ढगफुटीसदृश पाऊस झाला. काही वेळातच गावात सगळीकडे पाणीचपाणी झाले. सायंकाळपासून जिल्ह्याच्या अनेक भागात  पावसाने तडाखा दिला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> ‘लाख’मोलाची लाच स्वीकारताना कोल्हापुरात जिल्हा क्रीडा अधिकारी जाळ्यात

राज्यातील काही जिल्ह्यांत मुसळधार, काही जिल्ह्यांत अतिवृष्टी होणार असल्याचा इशारा देण्यात आला होता आज जिल्ह्यात सर्वत्र मुसळधार पावसाने हजेरी लावली.सायंकाळी पश्‍चिम दिशेकडून जोरदार वाऱ्यासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली.  करवीर, गगनबावडा, शिरोळ, हातकणंगले तालुक्यात पावसाने परिसर जलमय झाला.  आधी जोराचा वारा आणि त्यानंतर पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. शाळा सुटण्याच्या वेळेसच पाऊस सुरू झाल्याने विद्यार्थांना भिजत जावे लागले.  यामुळे पिकांना उभारी दिली आहे.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Normal life disturbed due to heavy rain across kolhapur zws