कोल्हापूर : कसबा बावडा येथील राजाराम सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक प्रकाश चिटणीस यांना झालेल्या माराहाण प्रकरणी कोल्हापूर महापालिकेचे माजी स्थायी समिती सभापती, आमदार सतेज पाटील गटाचे समर्थक डॉ. संदीप नेजदार यांच्यासह १५ जणांवर शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. डॉ. नेजदार यांच्यासह आठ जणांना अटक करण्यात आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राजाराम साखर कारखान्याच्या अन्यायकारक ऊस तोडणी कार्यक्रमा विरोधात काल ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी साखर सहसंचालक कार्यालयावर मोर्चा काढला. ऊस तोडणी कार्यक्रम क्रमवारीने न झाल्यास राजाराम कारखान्यावर स्वतः मोर्चा काढू, असा इशारा आमदार सतेज पाटील यावेळी दिला. यानिमित्ताने कारखान्यातील महाडिक – पाटील यांच्यातील वाद पुन्हा उफाळून आला आहे. तर सायंकाळी कार्यकारी संचालकांना बेदम मारहाणीनंतर वाद वाढत असल्याचे दिसत आहे.

आणखी वाचा-मुख्यमंत्री रोजगार निर्मितीत २० गुंठे शेतजमीन तारणावरही मिळणार ५ लाखांचे कर्ज; कोल्हापूर जिल्हा बँकेचा निर्णय

कार्यकारी संचालक प्रकाश चिटणीस यांना मारहाण प्रकरणानंतर सतेज पाटील गटाच्या २३ कार्यकर्त्यांवर गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. चिटणीस यांनी दिलेल्या फिर्यादीत संदीप नेजदार यांनी सहकाऱ्यांसमवेत केलेल्या मारहणीत सोन्याच्या चेनसह लाखांचा ऐवज चोरीला गेला आहे. राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत सतेज पाटील गट पराभूत होण्यास कार्यकारी संचालक प्रकाश चिटणीस जबाबदार असल्याच्या कारणातूनच मारहाण करण्यात आलीअसे फिर्यादीत म्हटले आहे.चिटणीस यांच्यावर सीपीआर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

सतेज पाटील मनोरुग्ण

दरम्यान, खासदार धनंजय महाडिक यांनी सतेज पाटील यांच्यावर कडाडून हल्ला चढवला. ते म्हणाले की, कारखान्याच्या अधिकाऱ्यांना मारहाण ही सहकारातील काळा दिवस आहे. सहकाराच्या इतिहासात आजपर्यंत असं कधीही घडलेलं नाही. कारखान्याच्या एमडींना मारहाण करणारे सतेज पाटलांचे गुंड आहेत. सतेज पाटील यांनी आपल्या गुंड प्रवृत्तीचे दर्शन काल दाखवून दिले. राजाराम कारखान्याच्या निवडणुकीत सतेज पाटील यांचा पराभव केला. ते मनोरुग्ण आहेत, पराभव पचवू शकत नाहीत. गुंड संदीप नेजदार यांचा सगळा ऊस कारखान्याने नेला आहे. कारखाना बदनाम करायचा म्हणून कट रचून हल्ला केला. हल्ला करणाऱ्या गावगुंडांवर कडक कारवाई केली पाहिजे. या सगळ्यांमध्ये सतेज पाटील यांची लिंक लागली तर त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल झाला पाहिजे.

आणखी वाचा-कोल्हापुरात हसन मुश्रीफ – सतेज पाटील या आजी माजी पालकमंत्र्यात निधी वाटपावरून संघर्ष

सतेज पाटील यांच्याकडे काही बंगालची माणस आहेत. जे जादूटोणा किंवा भविष्य बघत असतात, असा उपरोधीत टोला पाटील यांनी महायुतीवरून केलेल्या वक्तव्यावरून महाडिक यांनी लगावला. आमचा महायुतीतील अंतर्गत विषय आहे आम्ही बघून घेऊ. काँग्रेसच्या नेत्यांनी अशा पद्धतीचे वक्तव्य करणे गरजेचं नाही. सतेज पाटील पालकमंत्री असताना आम्हाला दहा टक्के नाही तर दहा रुपये देखील दिले नाहीत, त्यामुळे आता ते कोणत्या तोंडाने निधी मागत आहेत, असा सवाल त्यांनी केला. 

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rajaram factory executive director assault case satej patil supporter dr sandeep nejdar along with eight arrested mrj