न्यूकॅसलचा माजी फुटबॉलपटू मायकेल चोप्रा आणि पॅरिस सेंट जर्मेनचा माजी बचावपटू बेर्नार्ड मेंडी हे इंडियन सुपर लीगच्या (आयएसएल) पहिल्या मोसमासाठी रंगलेल्या आंतरराष्ट्रीय खेळाडूंच्या लिलावात आकर्षणाचा केंद्रिबदू ठरले. भारतीय फुटबॉलला नवी झळाळी देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या इंडियन सुपर लीगसाठी गुरुवारी मुंबईत ४९ आंतरराष्ट्रीय खेळाडूंवर बोली लावण्यात आली.
सचिन तेंडुलकर सहमालक असलेल्या केरळ ब्लास्टर्स एफसीने भारतीय वंशाच्या मायकेल चोप्राला लगेचच करारबद्ध केले, तर टीम चेन्नईने बेर्नार्ड आणि मँचेस्टर युनायटेडचा माजी खेळाडू बोजान जॉर्जिक यांच्यावर बोली लावली. ‘आयएसएल’च्या नियमांनुसार, बोलीची रक्कम जाहीर करण्यात आली नसली तरी चोप्राला ६० हजार अमेरिकन डॉलर आणि बेर्नार्ड व जॉर्जिक यांना प्रत्येकी ८० हजार अमेरिकन डॉलरचा भाव मिळाल्याचे समजते. क्रिकेटपटू, बॉलीवूड अभिनेते, उद्योजक यांचे मालकी हक्क असलेल्या तब्बल आठ फ्रँचायझींनी परदेशी खेळाडूंना करारबद्ध करून घेतले.
बॉलीवूड अभिनेता रणबीर कपूर याची सहमालकी असलेल्या मुंबई सिटी फुटबॉल क्लबने दिएगो नाडाया, जॅन स्टोहांझेल, जेवियर लक यांच्यावर बोली लावली. अॅटलेटिको माद्रिद आणि भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली यांच्या अॅटलेटिको डे कोलकाता संघाने बार्सिलोनाचा माजी फुटबॉलपटू जोफ्रे मटेऊ गोंझालेझ याला ६० हजार अमेरिकन डॉलरला विकत घेतले. कोलकाताने लिव्हरपूलचा माजी खेळाडू जोस गोंझालेझ रे, अर्नल कोंडे काबरे तसेच पॅरिस सेंट जर्मेनचा माजी गोलरक्षक अपौला इडेल बेटे यांना संघात समाविष्ट करून घेतले. पुण्याच्या संघाने याआधीच ब्रुनो सिरिल्लो आणि इमान्युएल बेलार्डी या इटलीच्या खेळाडूंना करारबद्ध करून घेतले होते. गुरुवारी संघात इव्हान पॅलासियोस, सैदेऊ पॅनान्डेटिगुरी, ओमर मार्टिनेझ, आंद्रेस रामिरेझ, पार्क क्वांग-इल या पाच खेळाडूंची भर पडली.
केरळ ब्लास्टर्स
खेळाडू देश
मायकेल चोप्रा इंग्लंड
इयान हुमे कॅनडा
विक्टर हेरेरो फोर्काडा स्पेन
एर्विन स्पिट्झनर ब्राझील
प्रेडो गुसमाओ ब्राझील
सेड्रिक हेंगबार्ट फ्रान्स
राफेल रोमे फ्रान्स
अॅटलेटिको डे कोलकाता
खेळाडू देश
बोर्जा फर्नाडेझ स्पेन
जोफ्रे मटेऊ गोंझालेझ स्पेन
जोस मिग्युएल गोंझालेझ रे स्पेन
अर्नल कोंडे काबरे स्पेन
सिल्व्हेन मोन्सोरेऊ फ्रान्स
याकुब पोडानी झेक
अपौला इडेल बेटे कॅमेरून
मुंबई सिटी फुटबॉल क्लब
खेळाडू देश
दिएगो नादाया अर्जेटिना
जॅन स्टोहांझल झेक
फ्रान्सिस्को फर्नाडेझ लक स्पेन
पाव्हेल कॉमव्होस झेक
जोहान लेटझेल्टर फ्रान्स
आंद्रे परेरा पोर्तुगाल
इलियस पोलालिस ग्रीस
टीम चेन्नई
खेळाडू देश
बेर्नार्ड मेंडी फ्रान्स
ख्रिस्तियान गोंझालेझ स्पेन
गेन्नारो ब्राकिग्लिआनो फ्रान्स
बोजान जॉर्जिक सर्बिया
ब्रुनो डे लिमा ब्राझील
जायरो कार्वाजाल कोलंबिया
एड्वाडरे सिल्वा लेर्मा स्पेन
नॉर्थ ईस्ट युनायटेड फुटबॉल क्लब
खेळाडू देश
इसाक चांसा झाम्बिया
कॉर्नेल ग्लेन त्रिनिदाद
मासाम्बा लो सॅम्बोऊ सेनेगल
डो डाँग-ह्यून कोरिया
गुल्हेर्मे डे कॅस्ट्रो ब्राझील
टोमास जोस झेक
लुइस पडिलिया कोलंबिया
दिल्ली डायनामोस
खेळाडू देश
मॅड्स जंकेर डेन्मार्क
मॉर्टेन स्कोउबो डेन्मार्क
ब्रुनो हेरेरो एरियस स्पेन
गुस्ताव्हो दोस सांतोस ब्राझील
मॅरेक सेक झेक
पॅव्हेल इलियस झेक
हेन्रिक ऑलिव्हिएरा दियास पोर्तुगाल
पुणे सिटी फुटबॉल क्लब
खेळाडू देश
ब्रुनो सिरिल्लो इटली
इमान्युएल बेलार्डी इटली
इव्हान पॅलासियोस स्पेन
सैदेऊ पॅनान्डेटिगुरी बुर्किना फासो
ओमर मार्टिनेझ कोलंबिया
आंद्रेस रामिरेझ कोलंबिया
पार्क क्वांग-इल कोरिया
टीम गोवा
खेळाडू देश
मिरोस्लाव्ह स्लेपिका झेक प्रजासत्ताक
जॅन सेडा झेक प्रजासत्ताक
ब्रुनो टावारेस पिन्हेरो पोर्तुगाल
यौनेस बेंगेलोऊन फ्रान्स
मिग्युएल हेर्लेन पोर्तुगाल
ग्रेगरी अर्नोलिन फ्रान्स
एडगर मार्सेलिनो पोर्तुगाल