आशियाई क्रीडा स्पर्धेतील गोळाफेकीत भारताच्या किरण बालियनने शुक्रवारी रौप्यपदक पटकावले. या स्पर्धेत पदक मिळवणारी ती ७२ वर्षांतील पहिली महिला भारतीय गोळाफेकपटू ठरली. २४ वर्षीय किरणने आपल्या तिसऱ्या प्रयत्नात १७.३६ मीटर अंतरावर गोळा फेकला. आशियाई क्रीडा स्पर्धेच्या गोळाफेकीत पदक मिळवणारी किरण ही दुसरी भारतीय महिला आहे. यापूर्वी बार्बरा वेबस्टर यांनी १९५१च्या स्पर्धेत भारतासाठी गोळाफेकीत कांस्यपदक जिंकले होते. किरणची वैयक्तिक आणि हंगामातील सर्वोत्तम कामगिरी ही १७.९२ मीटर अशी आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेत तिला या कामगिरीपर्यंत पोहोचता आले नसले, तरी तिने कांस्यपदक मिळवण्याची किमया साधली.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 30-09-2023 at 01:18 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bronze medal to kiran balian in shot put asian games victory ysh