इंग्लंडने भारतावर १० गडी राखून दणदणीत विजय मिळवत टी-२० विश्वचषक २०२२ च्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने १६८ धावा केल्या होत्या. त्यामुळे इंग्लंड संघाला १६९ धावांचे लक्ष्य मिळाले. हे लक्ष्य इंग्लिश संघाने अवघ्या १६ षटकांत पार केले. त्याचबरोबर इंग्लंडच्या सलामीवीरांनी आपल्या नावावर एका विश्वविक्रमाची नोंद केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

इंग्लंडच्या विजयात सर्वात मोठा वाटा होता तो सलामीवीरांचा,ज्यांनी विकेट न गमावता संघाला या लक्ष्यापर्यंत पोहोचवले. जोस बटलरने ८० आणि अ‍ॅलेक्स हेल्सने ८६ धावांची नाबाद खेळी केली. दोन्ही फलंदाजांमध्ये पहिल्या विकेटसाठी नाबाद १७० धावांची भागीदारी झाली. या भागीदारीच्या जोरावर बटलर आणि हेल्स यांनी टी-२० विश्वचषकात नवा विश्वविक्रम केला आहे.

जोस बटलर आणि अ‍ॅलेक्स हेल्सची भागीदारी ही टी-२० विश्वचषकाच्या इतिहासातील सर्वात मोठी भागीदारी आहे. यापूर्वी हा विक्रम दक्षिण आफ्रिकेच्या क्विंटन डी कॉक आणि रिले रुसो यांच्या नावावर होता. या विश्वचषकात बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात या दोन फलंदाजांमध्ये १६८ धावांची भागीदारी झाली होती. तर तिसऱ्या क्रमांकावर महेला जयवर्धने आणि कुमार संगकारा ही जोडी आहे, ज्यांनी २०१० मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध १६६ धावा जोडल्या होत्या. या यादीत चौथ्या आणि शेवटच्या स्थानावर बाबर आझम आणि मोहम्मद रिझवानची जोडी आहे, ज्यांनी २०२१ मध्ये भारताविरुद्ध नाबाद १५२ धावांची खेळी केली होती.

टी-२० विश्वचषकातील सर्वात मोठ्या भागीदाऱ्या –

१७०* जोस बटलर – अ‍ॅलेक्स हेल्स विरुद्ध भारत, २०२२
१६८ क्विंटन डी कॉक – रिले रुसो विरुद्ध बांगलादेश, २०२२
१६६ महेला जयवर्धने – कुमार संगकारा विरुद्ध वेस्ट इंडिज, २०१०
१५२ * बाबर आझम – मोहम्मद रिझवान विरुद्ध भारत, २०२१

याशिवाय आणखी दोन विक्रमांच्या यादीत या जोडीने आपली नावे नोंदवली आहेत.

हेही वाचा – T20 World Cup 2022: आकाश चोप्राच्या मते, ‘या’ तीन चुकांमुळे भारतीय संघ स्पर्धेतून झाला बाहेर, घ्या जाणून

भारताविरुद्ध टी-२० मध्ये कोणत्याही विकेटसाठी रचल्या गेलेल्य सर्वोच्च भागीदाऱ्या –

१७४* क्विंटन डी कॉक – डेव्हिड मिलर गुवाहाटी २०२२
१७०* जोस बटलर – अ‍ॅलेक्स हेल्स अ‍ॅडलेड २०२२
१५२* बाबर आझम – मोहम्मद रिझवान दुबई २०२१

मराठीतील सर्व T20 World Cup बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jos buttler and alex hales share highest partnership in history of t20 world cups against ind t20 wc 2022 vbm