Rehan Ahmed out of Test series against India : सलग दोन सामने गमावल्यानंतर इंग्लंड क्रिकेट संघ भारताविरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत मागे पडला आहे. रांची येथे चौथा कसोटी सामना खेळला जात आहे, जो जिंकून भारताला मालिका जिंकायची आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकल्यानंतर बेन स्टोक्सने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक झाल्यानंतर काही वेळातच संघाला मोठा धक्का बसला. फिरकीपटू रेहान अहमद भारत सोडून मायदेशी परतला असून तो माघारी येणार नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारताविरुद्धच्या रांची कसोटी सामन्यात उतरण्यापूर्वी इंग्लंड संघाला मोठा धक्का बसला आहे. संघाचा फिरकी गोलंदाज रेहान अहमदने या मालिकेतून आपले नाव मागे घेण्याचा निर्णय घेतला. त्याच्या मायदेशी परतल्याची माहिती इंग्लंड क्रिकेट बोर्डाने दिली. नाणेफेकीनंतर सांगण्यात आले की वैयक्तिक कारणांमुळे रेहानला भारत सोडून इंग्लंडला जावे लागले.

या मालिकेतील शेवटच्या सामन्यातही रेहान अहमद पुनरागमन करणार नाही. त्याच्या जागी कोणत्याही खेळाडूचा समावेश करण्यात आलेला नाही, असेही इंग्लंड क्रिकेट बोर्डाकडून सांगण्यात आले. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने आपल्या पोस्टमध्ये लिहले, “रेहान, काळजी घे. तो वैयक्तिक कारणामुळे मायदेशी परतला आहे. आता तो मालिकेतील शेवटचा सामना खेळण्यासाठीही भारतात परतणार नाही. तसेच त्याच्या जागी कोणत्याही खेळाडूचा समावेश करण्यात आलेला नाही.”

हेही वाचा – IND vs ENG 3rd Test : आकाश दीपचे शानदार पदार्पण! एकाच षटकात इंग्लंडच्या दोन स्टार फलंदाजांना धाडले तंबूत

सामन्याबद्दल बोलायचे, तर पहिल्या दिवशी लंच ब्रेकपर्यंत इंग्लंडने पहिल्या डावात ५ गडी गमावून ११२ धावा केल्या आहेत. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या इंग्लंड संघाची सुरुवात चांगली झाली नाही. आकाशने त्याच्या दुसऱ्याच षटकात झॅक क्रॉऊलीला क्लीन बोल्ड केले. मात्र, तो चेंडू नो बॉल ठरला. मात्र, आकाशने हार मानली नाही आणि त्यानंतर त्याने बेन डकेटला यष्टिरक्षक ध्रुव जुरेलकरवी झेलबाद केले. डकेट ११ धावा करू शकला.

हेही वाचा – IND vs ENG 4th Test : कोण आहे आकाश दीप? ज्याने रांची कसोटीत भारतासाठी केले पदार्पण

यानंतर त्याच षटकात त्याने ऑली पोपला एलबीडब्ल्यू आऊट केले. पोप खाते उघडू शकला नाही. एका षटकात दोन गडी बाद झाल्याने इंग्लिश संघाला सावरता आले नाही. यानंतर आकाशने क्रॉऊलीचा पुन्हा क्लीन बोल्ड केले. क्रॉऊलीला ४२ धावांवर बाद झाला. यानंतर अश्विनने जॉनी बेअरस्टोला तर रवींद्र जडेजाने बेन स्टोक्सला पॅव्हेलियनमध्ये पाठवून इंग्लंडचा अर्धा संघ पॅव्हेलियनमध्ये पाठवला. इंग्लंडचा संघ पहिल्या दोन तासातच अडचणीत सापडल्याचे दिसत आहे. बेअरस्टो ३८ तर स्टोक्सला तीन धावा करता आल्या. स्टोक्स बाद होताच लंचची घोषणा करण्यात आली.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs eng after the toss of the fourth test rehan ahmed withdrew from the series due to personal reasons vbm