Players Who Didn’t Get a Chance in IPL 2023 Season: नुकताच आयपीएल २०२३ चा दुसरा टप्पा सुरु झाला आहे. पहिल्या टप्प्यात अनेक युवा आणि अनुभवी खेळाडू चमकले. अनेक खेळाडूंना आयपीएलमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली. परंतु, अनेक धडाकेबाज खेळाडू अजूनही बेंचवर बसून आहेत. प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळण्याची वाट पाहत आहेत. सध्याच्या मोसमातील अशा चार ‘कमनशिबी’ खेळाडूंबद्दल आपण जाणून घेणार आहोत, संधी मिळाली तर तिचे सोने करण्यासाठी उत्सुक आहेत. या यादीत गुजरात टायटन्स (जीटी) चे दोन खेळाडू आहेत, तर लखनऊ सुपर जायंट्स (एलएसजी) आणि राजस्थान रॉयल्स (आरआर) यांचा प्रत्येकी एक खेळाडू आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

क्विंटन डी कॉक –

एलएसजीचा स्टार खेळाडू क्विंटन डी कॉकने गेल्या मोसमात स्फोटक फलंदाजी केली होती. त्याने आयपीएल २०२२ मध्ये १५ सामन्यात ५०८ धावा केल्या होत्या. पण दक्षिण आफ्रिकेचा डिकॉक १६व्या मोसमात एकही सामना खेळलेला नाही. खरे तर, सलामीवीर म्हणून जबरदस्त छाप पाडणाऱ्या वेस्ट इंडिजच्या के. मेयर्समुळे डिकॉकला संधी मिळत नाही. मेयर्सने आठ सामन्यांमध्ये ३७.१३च्या सरासरीने आणि १६०.५४ च्या स्ट्राइक रेटने २९७ धावा केल्या आहेत. ज्यामध्ये चार अर्धशतकांचा समावेश आहे.

जो रूट –

जगातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक असलेला इंग्लंडचा माजी कर्णधार जो रूटला राजस्थानने लिलावात एक कोटी रुपयांना विकत घेतले. आरआरने आतापर्यंत ८ सामने खेळले असून पाच जिंकले आहेत. आरआरने अद्याप रूटला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान दिलेले नाही. आरआरची शीर्ष फळी आणि मधल्या फळी फॉर्ममध्ये आहे. त्यामुळे आगामी सामन्यांमध्येही रूटला बेंचवर बसावे लागेल असे दिसते. रूट यंदा पहिल्यांदाच आयपीएलचा भाग बनला आहे.

हेही वाचा – RR vs MI: रोहित शर्माच्या वाढदिवसानिमित्त आरआरने शेअर केला मजेशीर व्हिडीओ, ‘या’ खेळाडूंनी हिटमॅनला मागितली पार्टी

दासून शनाका –

श्रीलंकेचा कर्णधार आणि डॅशिंग अष्टपैलू दासून शनाका गतविजेत्या गुजरातच्या संघात आहे. त्याला आजवर एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनच्या जागी संघात शनाकाचा समावेश करण्यात आला. चालू मोसमातील पहिल्याच सामन्यात विल्यमसनला दुखापत झाली होती. शनाकाही प्रथमच आयपीएलचा भाग बनला आहे. तो लिलावात अनसोल्ड राहिला होता. गुजरातने ७ पैकी ५ सामने जिंकले आहेत.

शिवम मावी –

गुजरातकडे आणखी एक स्टार खेळाडू आहे, जो बेंचवर बसला आहे. जीटीने वेगवान गोलंदाज शिवम मावीला लिलावात ६ कोटी रुपयांना विकत घेतले. पण एकाही सामन्यात त्याला संधी दिली नाही. मात्र, मावी दुसऱ्या टप्प्यात वेगवान गोलंदाजीत मोहम्मद शमीसोबत खेळताना दिसू शकतो. जीटीपूर्वी मावी कोलकाता नाइट रायडर्सचा (केकेआर) भाग होता. त्याने भारतासाठी ६ टी-२० सामन्यात १७.५७च्या सरासरीने ६ विकेट घेतल्या आहेत.

मराठीतील सर्व आयपीएल २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shivam mavi joe root dasun shanaka quinton de kock are the dashing players waiting to play in ipl 2023 vbm