इंदूर : नुकताच करोनामुक्त झालेल्या मोहम्मद शमीने आपली तंदुरुस्ती सिद्ध केल्यास त्याची जायबंदी जसप्रीत बुमराच्या जागी ट्वेन्टी-२० विश्वचषकासाठीच्या भारतीय संघात निवड होऊ शकेल, असे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडने संकेत दिले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पाठीच्या दुखापतीमुळे बुमराला ऑस्ट्रेलियात होणाऱ्या ट्वेन्टी-२० विश्वचषकाला मुकावे लागणार आहे. या स्पर्धेसाठी शमी आणि दीपक चहर या वेगवान गोलंदाजांची राखीव खेळाडू म्हणून निवड झाली आहे. ऑस्ट्रेलियात खेळण्याचा अनुभव शमीच्या पथ्यावर पडू शकेल.  ‘‘बुमराची जागा घेणाऱ्या गोलंदाजासाठी आम्ही विविध पर्यायांचा विचार करत आहोत. आम्हाला १५ ऑक्टोबपर्यंतचा वेळ आहे. ट्वेन्टी-२० विश्वचषकासाठी राखीव खेळाडूंमध्ये शमीचा समावेश आहे. त्याला नुकत्याच झालेल्या दोन मालिकांमध्ये खेळता आले नाही. सध्या तो राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत (एनसीए) आहे. करोनामुक्त झाल्यानंतर १४-१५ दिवसांत त्याची प्रकृती आणि तंदुरुस्तीबाबतचा वैद्यकीय अहवाल मिळाल्यानंतर आम्हाला पुढील निर्णय घेता येईल,’’ असे द्रविड म्हणाला.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mohammed shami likely to replace jasprit bumrah in t20 world cup zws