भारताचा माजी महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने गुरुवारी आपला ४१वा वाढदिवस साधेपणाने साजरा केला. सचिन आयपीएल स्पध्रेसाठी संयुक्त अरब अमिरातीमध्ये होता. परंतु दोन दिवसांपूर्वी तो मुंबईत आला असून त्याने आपला वाढदिवस कुटुंब आणि मित्रपरिवारासह साजरा केला.
गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती पत्करल्यानंतर सचिनचा हा पहिला वाढदिवस असून सचिनने तो साधेपणाने साजरा करायचे ठरवले होते. त्यासाठी त्याने आपल्या मित्रांना एका छोटेखानी पार्टीसाठी आमंत्रित केले होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sachin tendulkar celebrates 41st birthday