सचिन धरमशालेत खेळणार पहिला सामना

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

धरमशाला म्हणजे देवांची भूमी, पण या पतीत भूमीवर क्रिकेटचा देव समजला जाणारा सचिन तेंडुलकर अजूनही अवतरला नव्हता. पण आयपीएलच्या सामन्यांच्या माध्यमातून सचिन धरमशालेत पहिल्यांदाच अवरतणार असून येथील प्रशासकांपासून चाहत्यांना या क्षणाची उत्सुकता आहे. मुंबई इंडियन्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाब यांच्यामधील सामना १८ मे ला धरमशालेत खेळवण्यात येणार आहे.

सचिन धरमशालेत येणार हे कळल्यावर येथील चाहत्यांनी तिकिटांना भरघोस प्रतिसाद दिला आहे. आता जवळपास साऱ्या तिकिटी विकल्या गेल्या आहेत, असे हिमाचल प्रदेश क्रिकेट मंडळाच्या सचिवांनी पत्रकाद्वारे कळवले आहे.

याबाबत विचारले असता हिमाचल प्रदेश क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष अनुराग ठाकूर म्हणाले की, सचिन या मैदानात खेळतोय ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. या सामन्यासाठी आम्ही सर्व तयारीनिशी सज्ज आहोत. भारत आणि इंग्लंड यांच्यातील एकदिवसीय सामना २७ जानेवारीला या मैदानात खेळवण्यात आला होता. पण त्या वेळी सचिन भारतीय संघात नव्हता. त्यामुळे सचिनला पाहण्यासाठी मोठय़ा प्रमाणात चाहते या सामन्याला उपस्थित राहतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sachin will play first time at dharamshala