टी-२० विश्वचषक २०२४ चा सूर्यकुमार यादवचा अखेरच्या षटकातील सीमारेषेजवळील तो कमालीचा झेल आणि भारत वर्ल्ड चॅम्पियन ठरला. सूर्यकुमार यादवप्रमाणे खेळाडूंनी एकापेक्षा एक असे कमालीचे झेल टिपलेले आपण पाहिले आहेत. ज्याचे व्हीडिओही व्हायरल झाले आहेत. पण आता अशा कॅचबाबत आयसीसीने नियमात मोठा बदल केला आहे.

या बातमीसह विशेष लेख आणि इतर दर्जेदार मजकूर मोफत वाचा

आता आयसीसी आणि एमसीसीने अशा कॅचच्या नियमांमध्ये मोठा बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन नियमांनुसार, आता सीमेवर ‘बनी हॉप’ बेकायदेशीर मानले जाईल. ‘बनी हॉप’ या शब्दाचा अर्थ असा होतो जेव्हा एखादा सीमारेषवर झेल टिपताना चेंडू मैदानात उडवून सीमारेषेबाहेर जातो आणि पुन्हा आत येऊन झेल टिपतो.

सीमारेषेवर झेल घेण्याच्या नियमात बदल केल्यामुळे, क्षेत्ररक्षक सीमारेषेच्या आत असताना चेंडू मैदानात ढकलतो आणि सीमारेषेबाहेर जातो. यानंतर पुन्हा मैदानात येऊन झेल टिपला जातो. पण सीमारेषेच्या बाहेरून चेंडूला स्पर्श करणं बेकायदेशीर मानलं जाईल. याशिवाय, क्षेत्ररक्षक सीमेबाहेर फक्त एकदाच हवेत उडी मारून चेंडू पकडू शकतो.

पूर्वी, अनेक वेळा, सीमारेषेवर उभे असलेले खेळाडू चेंडू दोनदा सीमारेषेच्या बाहेर उडी मारून आणि नंतर सीमारेषेच्या आत येऊन पकडत असत, परंतु आता असं केल्यास तो झेल म्हणून पकडला जाणार नाही. तर जेव्हा दोन खेळाडू सीमारेषेवर एकत्र चेंडू पकडतात, तेव्हा त्या दोघांनाही त्यादरम्यान सीमारेषेच्या आत राहावे लागेल.

म्हणजेच, जर एखाद्या क्षेत्ररक्षकाने सीमारेषेवर आलेला चेंडू हवेत फेकला आणि तो सीमारेषेच्या बाहेर गेला, तर दुसऱ्या खेळाडूने तो चेंडू सीमारेषेच्या आत पकडण्यापूर्वी, त्या खेळाडूलाही मैदानात यावे लागेल, तरच तो झेल म्हणून गणला जाईल. जर नवीन नियम लागू झाले, तर २०२३ च्या बिग बॅश लीगमध्ये मायकेल नेसरने आणि २०२५ च्या आयपीएलमध्ये पंजाब किंग्ज विरुद्ध चेन्नई सुपर किंग्जकडून डेवाल्ड ब्रेव्हिसने घेतलेले झेल यासारखे झेल आता गणले जाणार नाहीत.

२०२३ मध्ये, बिग बॅश लीग (BBL) दरम्यान, मायकेल नेसरच्या बाउंड्री कॅचवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. त्यानंतर, कॅचिंगच्या नियमांमध्ये बदल करण्याची मागणी करण्यात आली. घडलं असं की BBL २०२३ मध्ये ब्रिस्बेन हीट आणि सिडनी सिक्सर्स यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्यादरम्यान, सिडनी सिक्सर्सचा फलंदाज जॉर्डन सिल्कने लॉन्ग ऑफवर एक कमालीचा फटका खेळला.

ब्रिस्बेन हीटचा खेळाडू मायकेल नासेरने चेंडू सीमारेषेवर पकडला पण त्याचा तोल गेला, त्यानंतर त्याने चेंडू सीमारेषेबाहेर हवेत फेकला, नंतर सीमारेषेबाहेर गेला, चेंडू पकडला आणि पुन्हा हवेत फेकला आणि नंतर आत येऊन चेंडू टिपला. पंचांनी सिल्कला बाद घोषित केले, पण सिल्क यावर खूश नव्हता. या झेलबद्दल बराच वाद झाला होता.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What is the boundary rule amended by icc mcc that will come into effect next week new fielding law change bdg