आघाडीची टेलिकॉम कंपनी भारती एअरटेल आपल्या युजर्सना मोफत 1GB हाय-स्पीड डेटासोबत फ्री इनकमिंग आणि आउटगोइंग व्हॉइस कॉलिंगची ऑफर देत आहे. दीर्घकाळापासून जे युजर्स आपल्या अकाउंटमध्ये रिचार्ज करत नाहीयेत अशांसाठी ही ऑफर कंपनीने आणली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दीर्घकाळापासून रिचार्ज न करणाऱ्या युजर्सना कंपनीकडून तीन दिवसांसाठी फ्री डेटा आणि कॉलिंगचा फायदा दिला जात आहे. OnlyTech च्या रिपोर्टनुसार, या ट्रायल ऑफरचा लाभ मिळणाऱ्या युजर्सना कंपनीकडून एसएमएसद्वारे माहिती दिली जात आहे. मेसेजचा एक स्क्रीनशॉटही शेअर करण्यात आला आहे. त्यामध्ये युजर्सना मोफत इनकमिंग आणि आउटगोइंग कॉलिंगसोबत 1 जीबी हाई-स्पीड डेटाचा उल्लेख आहे. यासोबतच अशाचप्रकारे अजून लाभ घेण्यासाठी अनलिमिटेड प्लॅनने रिचार्ज करण्याचं आवाहन करत आहे. एका महिन्यापेक्षा जास्त काळापासून रिचार्ज न केलेल्या एका युजरला या ऑफरचा फायदा मिळाल्याचं OnlyTech ने म्हटलं आहे.

मात्र, या ऑफरसाठी ग्राहकांची कशाप्रकारे निवड केली जात आहे याची कोणतीही अधिकृत माहिती कंपनीकडून देण्यात आलेली नाही. शिवाय ही ऑफर काही निवडक क्षेत्रांसाठी आहे की देशभरातील सर्व युजर्सना याचा फायदा मिळेल हे देखील स्पष्ट झालेलं नाही. पण आपल्या ग्राहकांना टिकवण्याचे प्रयत्न म्हणून कंपनीने अशाप्रकारची ऑफर आणली असल्याचं सांगितलं जात आहे. याशिवाय, काही दिवसांपूर्वी कंपनी आपल्या कमी किंमतीच्या म्हणजे 48 रुपये आणि 49 रुपयांच्या प्लॅन्सवरही मोफत अतिरिक्त १ जीबी हाय स्पीड डेटा देत होती.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Airtel offering 1gb high speed data and voice calling benefits as a free trial to inactive users says report check details sas