रिलायन्स जिओने बाजारात प्रवेश केल्यापासून स्पर्धेक कंपन्यांचे धाबे दणाणले आहे. ग्राहकांना एकाहून एक ऑफर देऊन खुश करण्याचा प्रयत्न कंपन्यांकडून केला जात आहे. यामध्ये सरकारी भागीदारी असलेली BSNL कंपनीही मागे नसून मागील काही दिवसांपासून कंपनी आपले एकाहून एक आकर्षक प्लॅन जाहीर करत आहे. नुकतीच कंपनीने एक अनोखी ऑफर जाहीर केली असून यामध्ये ग्राहकांना जुन्या प्लॅनमध्येच ६६ टक्के जास्त टॉकटाईम दिला जाणार आहे. प्रीपेड ग्राहकांसाठी असलेल्या २५२ रुपयांच्या रिचार्जवर कंपनी याआधी २१० रुपयांचा टॉकटाईम देत होती. आता या नव्या ऑफरनुसार २५२ रुपयांच्या प्लॅनमध्ये ३५० रुपयांचा टॉकटाईम दिला जाणार आहे. तसेच याबरोबरच २ जी आणि ३ जी २ जीबी डेटाही दिला जाणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

BSNL २५२ रुपयांच्या प्लॅनबरोबरच ४०२ रुपयांच्या प्लॅनमध्येही जास्तीचा टॉकटाईम मिळणार आहे. यामध्ये ६०० रुपयांचा टॉकटाईम मिळणार असून ४ जीबी इंटरनेट डेटा मिळेल. या दोन्ही ऑफर २१ जानेवारी २०१९ पर्यंत लागू होतील. कंपनीकडून या नवीन ऑफरबाबत आपल्या ग्राहकांना मेसेजद्वारे कळवण्यात येत आहे. सध्या ही ऑफर आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या दोन राज्यांसाठी लागू असेल. नंतर ती इतर राज्यांमध्येही लागू होईल. टॉकटाईमसाठीची व्हॅलिडीटी ३० दिवसांची असून डेटाची व्हॅलिडीटी ६० दिवसांची असेल. या ऑफरप्रमाणेच BSNL लवकरच आपल्या ब्रॉडबँडच्या ऑफर्सही जाहीर करणार आहे. त्यादृष्टीने नियोजन सुरु असल्याचे कंपनीने सांगितले आहे.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bsnl providing 66 percent more talk time on rs 252 prepaid recharge