D2h युजर्ससाठी चांगली बातमी आहे. ‘डायरेक्ट-टू-द-होम’ सर्व्हिस पुरवणारी D2h आपल्या युजर्सना चार दिवसांपर्यंत मोफत सर्व्हिस देत आहे. कंपनीच्या पोर्टफोलियोमध्ये एक महिन्यापासून 12 महिन्यांच्या व्हॅलिडिटीचे प्लॅन आहेत. लाँग टर्म प्लॅनने रिचार्ज करणाऱ्यांना कंपनी आधीपासूनच फ्री सर्व्हिसची ऑफर देत आहे. पण, आता कंपनी दोन महिन्यांच्या रिचार्जवर फ्री सर्व्हिस देत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एकाचवेळी करावं लागणार दोन महिन्यांचं रिचार्ज :
चार दिवसांच्या मोफत सेवेचा फायदा घेण्यासाठी D2h युजर्सना किमान दोन महिन्यांचं सब्स्क्रिप्शन एकत्र घ्यावं लागेल. या ऑफरअंतर्गत कंपनी दोन महिन्यांच्या रिचार्जवर डिस्काउंट न देता चार दिवस फ्री टीव्ही बघण्याची संधी देत आहे. यासाठी युजर कंपनीच्या वेबसाइट किंवा अॅप-D2h Infinity द्वारे आपले D2h कनेक्शन रिचार्ज करु शकतात.

एका महिन्यापर्यंत फ्री सर्व्हिस :
कंपनी आपल्या युजर्सना फ्री सर्व्हिसच्या काही बेस्ट ऑफर देत आहे. यामध्ये तीन महिन्यांच्या रिचार्जवर युजर्सना 7 दिवसांपर्यंत फ्री सर्व्हिस दिली जात आहे. तर, 6 महिन्यांचं रिचार्ज केल्यास 15 दिवसांची फ्री सर्व्हिस आहे. D2h च्या एका वर्षाच्या लाँग टर्म प्लॅनमध्ये तुम्हाला एका महिन्याचं सब्स्क्रिप्शन फ्री मिळेल. म्हणजे लाँग टर्म प्लॅनमध्ये 12 ऐवजी 13 महिन्यांसाठी तुम्हाला D2h सेवा वापरायला मिळेल.

सेट-टॉप बॉक्स :
कंपनीकडे सेट-टॉप बॉक्सचे पाच पर्याय आहेत. D2h चा पहिला डिजिटल सेट-टॉप बॉक्स 1499 रुपयांचा, तर HD व्हेरिअंटची किंमत 1599 रुपये आहे. याशिवाय डीटूएचच्या HD RF सेट-टॉप बॉक्सची किंमत 1799 रुपये आहे. हाच बॉक्स Magicstick सोबत खरेदी केल्यास 2198 रुपये द्यावे लागतील. कंपनीकडे युजर्ससाठी अँड्रॉइड सेट-टॉप बॉक्सही आहे. त्याची किंमत 2499 रुपये आहे.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: D2h offering 4 days of free service on 2 months of recharge check details sas