Healthy Lifestyle : पोषक आहार चांगल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. जर तुमचा आहार चांगला असेल तर तु्म्ही निरोगी राहता पण जर तुमचा आहार चांगला नसेल तर तुम्हाला आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे आहारतज्ज्ञ असो की डॉक्टर, नेहमी पोषक घटकांनी भरलेला आहार घेण्याचा सल्ला देतात. तुमचा आहार चांगला आहे का आणि तुम्ही नीट खाता का, हे कसं ओळखायचं? चला तर जाणून घेऊ या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

न्युट्रिशनिस्ट उर्वी गोहिल यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी तुम्ही नीट खात नसल्याचे पाच लक्षणे सांगितले आहेत. या पाच लक्षणांवरुन तुमचा आहार चांगला नाही, हे समजून येईल.

न्युट्रिशनिस्ट उर्वी गोहिल यांनी सांगितल्याप्रमाणे –
१.तुम्हाला नीट झोप येत नाही
२.तुम्हाला सतत झोपावसं वाटतं.
३. तुम्हाला बद्धकोष्ठतेचा त्रास जाणवतो.
४. व्यायाम करताना थकवा जाणवतो.
५. तुम्ही चिडचिड करता.

हेही वाचा : महिलांनो, मासिक पाळी अनियमित येते? ही योगासने ठरतील फायदेशीर; पाहा व्हिडीओ

न्युट्रिशनिस्ट उर्वी गोहिल यांनी enrich_lifestyle_with_urvi या त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन ही पोस्ट शेअर केली असून या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “प्रत्येक लक्षणे ही आपल्या जीवनशैलीविषयी बरंच काही सांगतात. जेव्हा तुम्ही मसालेदार जेवण करता तेव्हा तुम्हाला अॅसिडीटी होते. जेव्हा तुम्ही खूप जास्त गोड खाता, तेव्हा त्वचेवर मुरुम येतात. जेव्हा तुम्ही व्यायाम करत नाही, तेव्हा तुमचे स्नायू कमकूवत होतात.त्याचप्रमाणे वरील लक्षणे जाणवली तर समजायचे तुम्ही नीट पोषक आहार घेत नाही.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Five signs that show you are not eating well healthy eating can improve your lifestyle ndj