Yoga For Irregular Periods : मासिक पाळी हा स्त्रियांच्या आयुष्यातील महत्त्वाचा भाग आहे. दर महिन्याला एका ठराविक कालवधीनंतर मासिक पाळी येते पण अनेक स्त्रियांना मासिक पाळी अनियमित येते. अनियमित मासिक पाळीमुळे आरोग्यावर अनेक परिणाम होतात. कित्येक स्त्रिया या समस्येचा सामना करतात. अनेकदा डॉक्टरांकडे जाऊन सुद्धा काहीही फायदा होत नाही पण आज आम्ही तुम्हाला काही योगा प्रकार सांगणार आहो. हे योगा प्रकार नियमित केल्यामुळे मासिक पाळी नियमित येण्यास मदत होऊ शकते.
योग अभ्यासक मृणालिनी यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये मृणालिनी महिलांच्या मासिक पाळीसाठी अतिशय उपयुक्त ठरतील अशी काही योगासने करून दाखवत आहेत. ती योगासने खालीलप्रमाणे :

  • उत्कटकोणासन – ५-१० वेळा करावे.
  • मलासन – ६० सेकंद करावे
  • बद्धकोणासन – ६० सेकंद करावे
  • अर्धमत्स्येंद्रासन – दोन्ही बाजूने ३०-६० सेकंद करावे
  • मार्जरीआसन – ५-१० वेळा करावे

हेही वाचा : Weight Loss : सणासुदीत गोड अन् तेलकट पदार्थ खाल्ल्यामुळे वजन वाढते; दिवाळीनंतर वाढलेले वजन कसे कमी करावे?

AI shield to protect against cyber criminals
सायबर गुन्हेगारांपासून बचावासाठी ‘एआय’ची ढाल
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
ie thinc fourth edition
‘हवामान बदल थोपवण्यासाठी निधीची गरज’
women employees ratio in indian companies reached 36 6 percent in current year
विश्लेषण : भारतीय महिलांचा टक्का वाढतोय ?
RBI Governor Shaktikanta Das statement on inflation control
महागाई नियंत्रणासाठी विकासाचा बळी नको; रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांचे प्रतिपादन
cyber crimes on name of increasing subscriber likes and followers on social media
सोशल मीडिया युजर्ससाठी महत्त्वाची बातमी… लाईक्स, फालोअर्स आणि सबस्क्राईबर…
University of Mumbai, Artificial Intelligence Model,
कृत्रिम बुद्धिमत्ता मॉडेलच्या विकासासाठी मुंबई विद्यापीठाची अनोखी झेप! आजारांचे आगाऊ निदान होणार…
cybercriminals india post fraud marathi news
विश्लेषण: सायबर गुन्हेगारांकडून ‘पोस्टल स्कॅम’चा वापर… काय आहे हा कुरिअर फसवणुकीचा नवा प्रकार?

yogamarathi या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन मृणालिनी यांनी हा व्हिडीओ शेअर केला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “चुकीचा आहार, झोपेच्या अनियमित वेळा, ताण-तणाव, हार्मोनल असंतुलन, पीसीओडी, अनुवंशिकता, अतिरिक्त वजन व शरीराची हालचाल कमी असणे या काही कारणांमुळे मासिक पाळी अनियमित येऊ शकते”

त्या पुढे सांगतात, “आहारात साखर, मीठ, मैद्याचे पदार्थ, तेलकट पदार्थ कमी करा. हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करावा. सॅलड खावे.भरपूर पाणी प्यावे.अतिरिक्त वजन/ चरबी कमी करा. नियमित चालणे/ पळणे, दोरी च्या उड्या, सूर्य नमस्कार, डायनॅमिक योगासने, व ओटीपोटीवर ताण येईल अशी योगासने करा. त्याचबरोबर व्हिडीओमध्ये दाखवलेली सगळी योगासने नियमितपणे करा. टेन्शन, ताणतणाव मॅनेज करण्यासाठी प्राणायाम व मेडिटेशन करा, गाणी ऐका, निसर्गात फिरायला जा.”

या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने विचारले, “पोट कमी करण्यासाठी काही उपाय सांगा” तर एका युजरने विचारले, “17 महिन्यांपासून पाठदुखीचा त्रास आहे.यावर काही उपाय सांगा”