गणेशोत्सव म्हटलं की बाप्पाला आवडणाऱ्या मोदकांवर ताव मारला जातो. आता मोदक म्हटलं की गोडच असं समीकरण बनलंय. पण सतत गोड खाऊन नको होतं. तसंच सध्या कुटुंबात मधुमेहाचा त्रास असणारी मंडळीही असतातच. त्यामुळे आरती झाल्यावरच्या नैवेद्याला किंवा जेवणाच्या ताटातही तिखट काहीतरी असावं असं वाटतं. आता तिखट मोदकंच करता आले तर? त्यातही भाज्यांचा वापर करुन हेल्दी आणि काहीसे टेस्टी मोदक बनवले तर सणावाराच्या दिवसांत सगळ्यांनाच त्याचा आनंद लुटता येईल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

साहित्य : दीड कप मैदा, दोन चमचे तेल, अर्धा कप पालक पेस्ट, मीठ चवीनुसार

सारणासाठी लागणारं साहित्य : एक कप वाटाणे (उकडून वाटलेले), एक मध्यम आकाराचा उकडलेला बटाटा, कोथिंबीर, एक चमचा लिंबू रस, एक चमचा साखर, मीठ, हळद, तिखट, मिरची-जिरं पेस्ट

कृती :

पालक उकडून मिक्सरमध्ये वाटून घ्या.

मैदा, तेल, मीठ, पालक पेस्ट एकत्र करून घट्ट पीठ मळा.

कढईत तेल गरम करून त्यात वाटाणा, बटाटा व वरील सर्व मसाला घालून एकत्र करा.

पालकाच्या कणकेचा छोटा गोळा घेऊन तो हातावरच जरा खोलगट करा. त्यात सारण भरून मोदकाप्रमाणे आकार देऊन तळून घ्या.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ganesh utsav recepie palak matar modak scsg