ट्रांशन होल्डिंग्सचा प्रीमियम स्मार्टफोन ब्रॅंड इंफिनिक्सच्या ‘एस4’ या स्मार्टफोनसाठी नवं व्हेरिअंट भारतात लाँच करण्यात आलं आहे. 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज असलेलं हे व्हेरिअंट ‘बिग फ्रिडम सेल’दरम्यान फ्लिपकार्टवर विक्रीसाठी उपलब्ध होईल. मे महिन्यात 3जीबी रॅम प्रकारात हा फोन भारतात लाँच करण्यात आला होता.
मिलन ब्लॅक, सफायर सायऐन आणि गोल्ड या तीन रंगांमध्ये हा फोन उपलब्ध असणार आहे.सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी या फोनमध्ये आर्टिफिशिअल इंटेलिजन्स(AI – कृत्रीम बुद्धिमत्ता )असिस्टेड फेस अनलॉक, AI कॅमेरा, AI ब्युटी आणि बोकेह मोडसह 32 मेगापिक्सलचा कॅमेरा आहे. या स्मार्टफोनमध्ये 4000mAh क्षमतेची बॅटरी आहे. कनेक्टिव्हिटीसाठी यामध्ये ड्युअल 4G VoLTE, ब्ल्यू-टुथ 5.0, वाय-फाय, ड्युअल-सीम, जीपीएस, 3.5mm ऑडिओ जॅक आणि मायक्रो युएसबी पोर्टचा पर्याय आहे. याशिवाय फोनमध्ये फिंगरप्रिंट सेंसर आणि फेस अनलॉक फीचर आहे. 141 ग्राम इतकं या फोनचं वजन आहे.
Infinix S4 मध्ये 6.26 इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले असून याचा अॅस्पेक्ट रेशो 19:9 आहे. यामध्ये ऑक्टाकोर मीडियाटेक हीलियो P22 कोरटेक्स A53 प्रोसेसरचा वापर करण्यात आला आहे. हा फोन अँड्रॉइड 9 पायवर कार्यरत असतो. याशिवाय फोनमध्ये 3GB रॅम आणि 32GB स्टोरेज आहे. मायक्रोएसडी कार्डद्वारे 128GB पर्यंत मेमरी वाढवता येते. 32 एमपी सेल्फी कॅमेरा आणि वाइड अँगल लेन्स सहित ट्रिपल रिअर कॅमेरा (13MP+2MP+8MP ) असलेला हा दहा हजार रुपयांच्या श्रेणीतील पहिलाच फोन असल्याची शक्यता आहे.
10 हजार 999 रुपये इतकी Infinix S4 च्या नव्या व्हेरिअंटची किंमत ठेवण्यात आली आहे, पण 8 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या ‘बिग फ्रिडम सेल’दरम्यान हा फोन 8 हजार 999 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. यापूर्वी बाजारात या स्मार्टफोनसाठी 3 जीबी रॅम आणि 32 जीबी स्टोरेज असलेलं व्हेरिअंटच उपलब्ध होतं. विशेष म्हणजे या व्हेरिअंटची किंमत 8 हजार 999 रुपये आहे, मात्र सेलमध्ये 7 हजार 999 रुपये इतकी किंमत असेल.