Black Jeans Hacks: ब्लॅक जीन्स ही जवळजवळ प्रत्येकाकडेच असते. परंतु कडक उन्हात वारंवार धुऊन याचा रंग फिका पडतो. मुलांच्या असो वा मुलींच्या प्रत्येकाच्या कपाटात काळी जीन्स असतेच. मुळात काळी जीन्स आपल्या प्रत्येक लुकसोबत परफेक्ट जाते. सगळेच नेहमीच काळ्या जीन्सला प्राधान्य देतात. पण काळी जीन्स घेण्याचे काही तोटे सुद्धा आहेत आणि ते म्हणजे कितीही ब्रॅंडेड जीन्स घ्या एकावेळेनंतर ती पांढरी दिसायला लागते. तुमच्या काळ्या जीन्सचा रंगही फिका पडला असेल आणि तुम्हाला तो पुन्हा नव्यासारखा करायचा असेल, तर येथे सांगितलेली सोपी पद्धत फॉलो करा.

काळ्या जिन्सचा रंग उडालाय? घरच्या घरीच परत आणा नव्यासारखी चमक

या स्टोप्स फॉलो करा

१. सर्वात आधी एका पातील्यात पाणी उकळायला ठेवा.

२. आता त्यात ४ चमचे मीठ टाका.

३. पाणी उकळलं की ते एका बादलीत काढून घ्या. ही बादली शक्यतोवर जुनी घ्या, कारण काळा रंग बादलीला राहू शकतो आणि यावरून आईचा ओरडा मिळू शकतो.

४. त्यात आता फक्त पाच रुपयाला येणारी काळ्या रंगाची कपडे डाय करण्याची पुडी टाका. ही पुडी तुम्हाला आरामात किराणा दुकानात किंवा कटलरीच्या दुकानात मिळेल.

५. आता एका काठीच्या मदतीने पूर्ण पाणी नीट ढवळून घ्या अन् त्यात आपली जीन्स टाका.

६. ही जीन्स पण काठीने पूर्ण भिजवून घ्या. हात टाकू नका नाहीतर हाताला चटका लागेल.

७. अर्धा पाऊण तासाने पाणी थोडं कोमट झालं की जीन्स आपल्या हाताने जरा फिरवून भिजवून घ्या म्हणजे जीन्सच्या प्रत्येका बाजूला रंग लागेल.

८. तुम्ही ही जीन्स रात्रभर किंवा ४-५ तास तशीच पाण्यात ठेवू शकतात.

९. आता जीन्स त्या पाण्यातून काढून स्वच्छ पिळून घ्या आणि वाळायला ठेवून द्या.

१०. एका दुसऱ्या भांड्यात साधं पाणी घ्या आणि त्यात ३-४ चमचे मीठ घ्या आणि त्यात ही जीन्स दोन तासांसाठी भिजत घाला.

हेही वाचा >> Purity of almonds at home: तुम्ही खाताय तो बदाम अस्सल की बनावट? घरच्या घरी सहज ओळखा फरक

११. एकदा जीन्स स्वच्छ पाण्यात पिळून घ्या आणि परत वाळत घाला.

१२. तुमची जुनी जीन्स अगदी नव्या सारखी तयार आहे.