कधी कधी विरंगुळा म्हणून तुम्ही पत्ते खेळला असाल. जोड पत्ते, रमी, तीन पत्ते, पाच-तीन-दोन असे खेळ तुम्ही खेळला असाल. पत्ते खेळता जरी येत नसले तरी तुम्हाला कोणतं पान काय आहे, हे तर माहिती असतं. बदाम, इस्पिक, चौकट व किलावर या चार चिन्हांचे प्रत्येकी १३ असे मिळून एकूण ५२ पत्ते असतात. बदाम व चौकट या चिन्हांचा रंग लाल तर इस्पिक व किलावर यांचा काळा असतो. प्रत्येक चिन्हाच्या १३ पत्त्यांची विभागणी एक्का, दुर्री, तिर्री या क्रमाने दश्शीपर्यंत असते. पुढे त्याच क्रमाने गुलाम, राणी आणि राजा हे दरबारी पत्ते असतात. प्रत्येक पत्त्याच्या डावामध्ये अतिरिक्त पत्ता म्हणजे ‘जोकर’ असतो. हे दोन असतात. ५२ पत्त्यांमध्ये चार राजे असतात. या चार राजांपैकी एक राजा वेगळा असतो. बदामचा राजा इतर राजांपेक्षा वेगळा दिसतो. तर बाकीचे तीन राजे एकसारखे दिसतात. कारण बदामच्या राजाला मिशी नसते. विचारात पडलात ना? असं का असेल म्हणून. बदामच्या राजाबाबत बऱ्याच गोष्टी आहेत. प्रत्येक जण आपल्या पद्धतीने ती सांगत असतो.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ब्रिटनमधील वृत्तपत्र द गार्डियननं आपल्या वृत्तात सांगितलं आहे की, पूर्वी बदामच्या राजाला मिशी होती. मात्र जेव्हा कार्ड रिडिझाइन करायला दिले, तेव्हा डिझाइनर मिश्या काढायला विसरला. तेव्हापासून बदामचा राजाला मिशी नाही. ही चूक दुरूस्त करता आली असती मात्र तसं केलं नाही. कारण बदामचा राजा फ्रेंच राजा शारलेमेनचा फोटो आहे. हा राजा दिसायला सुंदर आणि लोकप्रिय होता. यासाठी सर्वात वेगळं दिसावं म्हणून मिश्या काढण्यात आल्या होत्या. किंग ऑफ हार्टच्या नावाने हॉलिवूडमध्ये एक चित्रपटही आहे. यातही राजा मिश्या नाहीत.

बटाट्यापासून तयार केलेलं दूध कधी पाहिलं आहे का? हेल्थ ड्रिंक म्हणून बाजारात दाखल

एक असंही गोष्ट सांगितले की, एका राजाला चार मुलं होती. ही चार मुलं पत्त्यांवर रेखाटण्यात आली आहेत. त्यापैकी एका राजाला मिशी नव्हती. त्यामुळे बदामचा बिना मिशीचा आहे. दुसरीकडे, असंही सांगितलं जातं की ही चार राजांची प्रतिकं आहेत. त्यानुसार पत्त्यात रेखाटण्यात आली आहेत.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why doesnt the king of heart have a mustache know reason rmt