- जेवणानंतर तोंडाला येणारा बुळबुळीतपणा सुपारीने नाहीसा होतो म्हणून जेवणानंतर विविध प्रकाराने केलेली सुपारी नुसती किंवा विडय़ाच्या पानांतून खाल्ली जाते. ही तोंडात बराच वेळ ठेवून चावत राहिल्याने दात बळकट होतात, हिरडय़ा घट्ट होतात.
- सुपारी ही सर्व प्रकारच्या जंतावर उत्तम औषध आहे. सुपारीतील मादक द्रव्यामुळे जंतास मोह येतो. ते अर्धमेल्या अवस्थेत जाऊन बाहेर पडून जातात. या ‘मोह’ गुणामुळेच की काय, नियमित सुपारी खाणाऱ्यांना झोप चांगली लागते, असे म्हणतात.
- वारंवार कफाने घसा खवखवणे, घसा बसणे, वारंवार तोंड येणे या विकारांतही सुपारी चघळल्याने फायदा होतो. अतिघाम येणाऱ्यांनाही सुपारीचा उपयोग होते.
- अर्धशिशीवर ‘अर्धी सुपारी’ उगाळून दुखणाऱ्या अध्र्या बाजूच्या कपाळावर लेप लावावा. सुपारी जाळून होणारी राख तिळाच्या तेलातून खरूज-नायटय़ावर लावावी. चिंचोक व सुपारी पाण्यात उगाळून तो लेप गरम करून दिवसातून तीन वेळा लावल्यास दोन ते तीन दिवसांत ‘गालगुंड’ बरे होतात.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 03-09-2016 at 00:54 IST
मराठीतील सर्व लोकआरोग्य बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Betel nut