गणेश विसर्जन मिरवणुकीवेळी पोलीसांच्या श्रींच्या मूर्तीचे तलावात विसर्जन करीत असताना तराफा कलला. तराफ्यावर असलेले दहा ते बारा पोलीस बचावले. सार्वजनिक मंडळाच्या १७० श्रींच्या विसर्जन मिरवणुका पार पडल्यानंतर मिरज शहर पोलीस ठाण्यातील विसर्जन मिरवणूक काढण्यात आली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा सरकारला घरचा आहेर, ‘महात्मा गांधी म्हणत गावाकडे चला अन् आता…’

अधिक्षक बसवराज तेली यांच्या हस्ते आरती झाल्यानंतर ध्वनीवर्धक, बेंजोच्या साथीने खास पोशाखात उप अधिक्षक प्रणिल गिल्डा, निरीक्षक संजीव झाडे महिला व पुरुष कर्मचारी मिरवणुकीत सहभागी झाले होते. गणेश तलावात मूर्तीचे विसर्जन करीत असताना तराफा एका बाजूला कलला. अचानक उद्भवलेल्या बिकट स्थितीत पोलीसांनी पाण्यात उड्या मारल्या. यामुळे दुर्घटना टळली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 12 police personnel survived after raft capsizes in sangli during ganesh idol immersion zws