बुधवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुंबईतील शिवाजी पार्कवर भव्य सभा पार पडली. यावेळी राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. तसेच महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरही त्यांनी भाष्य केलं. राजकीय नेत्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणाचा विचका करू ठेवलाय, असं ते म्हणाले. याबरोबरच त्यांनी शिवराज्यभिषेक दिनाला म्हणजेच ६ जून रोजी रायगडावर जाणार असल्याचंही सांगितलं. दरम्यान, राज ठाकरेंच्या भाषणावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी खोचक टीका केली आहे.
काय म्हणाले अमोल मिटकरी?
मनसेच्या मेळाव्यावर ट्वीट करताना मिटकरींनी राज ठाकरेंचा उल्लेख हास्यसम्राट असा केला. “धन्य ते हास्यसम्राट आणि धन्य त्यांची हास्यजत्रा..महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या प्रश्नांशी काही देणघेणे नसलेले हास्यसम्राट ६ जूनला रायगडावर जाणार असं समजलं, पण हे महाशय गड चढून जाण्याची हिंमत करतील का?” अशी खोचक टीका त्यांनी केली. तसेच गड चढायला मावळ्याचं काळीज असावं लागतं, कावळ्याची टीवटीव नव्हे, असं म्हणत त्यांनी राज ठाकरेंना डिवचलं.
हेही वाचा – “माझ्या भाषणानंतर उद्या तोंड उचकटू नका, नाहीतर…”, राज ठाकरेंचा उद्धव ठाकरे गटाला थेट इशारा!
दरम्यान, बुधवारी राज ठाकरे