Chhagan Bhujbal : छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळातून डावलण्यात आलं आहे. त्यानंतर जोरदार शक्तिप्रदर्शन करत छगन भुजबळ यांनी नाशिकमध्ये समता परिषदेचा मेळावा घेतला. या मेळाव्यात छगन भुजबळ ( Chhagan Bhujbal ) यांनी अजित पवार यांना प्रश्न विचारला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मला मंत्रिपदाची हाव नाही-छगन भुजबळ

“मी आमदार होणं किंवा मंत्री होणं हे माझं काम नाही. मला मंत्रिपदाची हाव असती तर मी १६ नोव्हेंबरला राजीनामा देऊन १७ नोव्हेंबरला आलो नसतो. असंही छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे. मी राजीनामा दिला होता पण उल्लेख केला नाही कारण मला तसे फोन सारखे येत होते. मी राजीनामा दिला होता हे मी अडीच महिन्यांनी सांगितलं. माझ्याविरोधात अर्वाच्य बोललं गेलं तेव्हा मी सांगितलं. प्रश्न फक्त मंत्रिपदाचा नाही तर अस्मितेचा आहे. असंही छगन भुजबळ ( Chhagan Bhujbal ) यांनी म्हटलं आहे. एखाद्या समाजाला बरोबर घेऊन लढणारी माणसं आपल्याकडे आहेत. कुणीही दुःखात राहण्याचं कारण नाही. “कभी डर न लगा मुझे फासला देखकर, मै बढता गया रास्ता देख कर, खुदही खुद नजदिक आती गयी मंजिल मेरा बुलंद हौसला देखकर”. असा शेरही छगन भुजबळ ( Chhagan Bhujbal ) यांनी म्हटला आणि आपली भूमिका मांडली.

हे पण वाचा- Chhagan Bhujbal on Ajit Pawar: “यापुढे जे कोणी…”; छगन भुजबळ यांचं आवाहन

एक वक्त ऐसा आयेगा की तेरी राय भी बदलेगी

आता लढाई आमदार म्हणून लढणार. तिथे कितीही बंधन असली तरी रास्ता तो मेरा है असंही छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) म्हणाले. ते पुढे म्हणाले, “मी संपूर्ण राज्यात जाणार. एवढंच नाही तर अनेक राज्यांराज्यात जाणार. पुन्हा ओबीसीचा एल्गार करणार. दिल्लीत रामलिला मैदान भरवलेलं सगळ्यांनी बघितलं होतं. पाटणा, बिहारमध्ये पाऊस पडला तरी लोक बसले होते. इंदिरा गांधी, जयप्रकाश नारायण यांच्या सभांच्या नंतर समता परिषदेची सभा इतकी मोठी झाली. पूर्ण मैदान भरलं होतं. काहींचं आपल्याबद्दल वेगळं मत निर्माण झालं आहे. त्यांना मी इतकंच सांगू इच्छितो, ‘मेरे बारे मे कोई राय मत बनाना गालिब.. एक ऐसा दौर आयेगा मेरा वक्त भी बदलेगा और तेरी राय भी बदलेगी.’ असाही शेर छगन भुजबळ ( Chhagan Bhujbal ) यांनी म्हटला आहे.

अवहेलनेचं शल्य मनात आहे पण…

मंत्रिपद मिळालं नाही तरीही मी रस्त्यावर आहे. अवहेलनचं शल्य मनात आहे. मी तुम्हा सगळ्यांशी चर्चा करुन पुढचं पाऊल उचलणार आहे. विचारपूर्वक निर्णय घेन. मै मौसम नहीं जो पल में बदल जाऊं, मै उस पुराने जमाने का सिक्का हूँ, ऐसेही फेक न देना तुम्हारे बुरे वक्तमें.. असाही शेर छगन भुजबळ यांनी म्हटला. तसंच ते पुढे म्हणाले की प्रश्न माझ्या मंत्रिपदाचा नाही, ओबीसी समाजाचे प्रश्न निर्माण होतील तेव्हा संरक्षणाची ढाल कोण उभी करणार? मंत्रिपद आलंही आणि गेलंही एवढंच काय विरोधी पक्षनेता म्हणूनही मी काम केलं आहे, असंही छगन भुजबळ ( Chhagan Bhujbal ) म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chhagan bhujbal ask this question to ajit pawar about obc community what did he say scj