राज्यातील सत्तासंघर्ष, आमदार अपात्रता आणि खरी शिवसेना कोणाची, मुद्द्यांवर सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यीय घटनापीठाकडे सुनावणी सुरु आहे. त्यात आता शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपावर हल्ला केला आहे. मला आई भवानी, न्यायदेवतेवर विश्वास आहे. विजय आपलाच होणार आहे. कितीही अफजल खान आले तरी घाबरणार नाही, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी अप्रत्यक्षपणे गृहमंत्री अमित शाह यांच्यावर टीका केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

उस्मानाबाद येथून आलेल्या कार्यकर्त्यांनी मातोश्रीवर शिवबंधन बांधलं. यावेळी उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना संबोधित केलं. तेव्हा आमदार कैलास पाटील, खासदार ओमराजे निंबाळकर उपस्थित होते.

हेही वाचा – विश्लेषण : शिवसेना वि. शिंदे गट वादात १९७२ च्या ‘त्या’ प्रकरणाचा दिला जातोय संदर्भ; नेमका काय होता ‘सादिक अली वि. निवडणूक आयोग’ खटला?

“आई भवानीचा आशीर्वाद असल्यावर कितीही अफजल खान आले तरी घाबरणार नाही. दसऱ्याला आपण भेटणार आहोत. एक चांगली सुरूवात झाली आहे. न्यायालयात दुसरी केस सुरु आहे. माझा आई भवानीवर आणि सर्वोच्च न्यायालयावर विश्वास आहे. न्याय आपल्याला मिळणार,” असा विश्वास उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला आहे.

“खच्ता खाऊन मोठे केले, ते खोक्यात गेले”

“तुळजाभवानीच्या दर्शनाला मी येणारच आहे. मला धाराशिव जिल्ह्याचे कौतुक करायचं आहे. कारण कैलासने काय पराक्रम केलं सर्वांना माहिती आहे. ओमराजे देखील कसा रक्त पाळतोय हे तुम्ही देखील पाहिलं आहे. जिथे लोकप्रतिनिधी घट्ट आहेत, तिथे शिवसैनिक घट्ट राहणारचं. ज्यांना तुम्ही खच्ता खाऊन मोठे केले, ते खोक्यात गेले,” असा हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदारांवर केला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cm uddhav thackeray attacks amit shah in mumbai ssa