विश्वासदर्शक ठरावावेळी गैरहजर राहिलेल्या ९ काँग्रेस आमदारांना पक्षाकडून नोटीस

अनुपस्थित राहून अप्रत्यक्षपणे आम्हाला मदत करणाऱ्या अदृश्य हातांचा आभारी आहे, असे विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते.

congress
( संग्रहित छायचित्र )

Congress Issues Notice MLAs : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारवरील विश्वासदर्शक ठरावावरील मतदानाच्या वेळी काँग्रेसचे ११ आमदार अनुपस्थित होते. यापैकी ९ आमदारांना पक्षाने नोटीस बजावली आहे. यात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचाही समावेश आहे.

विश्वासदर्शक ठरावावर सकाळी ११ वाजता मतदानास सुरुवात झाली होती. सभागृहात आमदारांची उपस्थिती राहील याची खबरदारी सत्ताधारी भाजप आणि शिंदे गटाने घेतली होती. मात्र, काँग्रेसचे अशोक चव्हाण, विजय वडेट्टीवार, झिशान सिद्दिकी, धीरज देशमुख आदी आमदार विलंबाने पोहोचले. त्यांना बाहेर लॉबीतच थांबावे लागले. मतदानाची प्रक्रिया पूर्ण होताच विरोधकांची मते अध्यक्षांच्या निवडणुकीच्या तुलनेत कमी पडल्याने कोण गैरहजर आहे, याचा आढावा घेण्यात आला. काँग्रेसचे नऊ आमदार वेळेत पोहोचू शकले नव्हते. दोन जण पूर्वकल्पना देऊन गैरहजर होते.

दरम्यान, ‘अनुपस्थित राहून अप्रत्यक्षपणे आम्हाला मदत करणाऱ्या अदृश्य हातांचा आभारी आहे, असे विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्याने काँग्रेसमध्ये चलबिचल सुरू झाली होती. मात्र, आता या संदर्भात पक्षाकडून आमदारांना जाब विचारण्यात आला आहे.

हेही वाचा – उदयपूर, अमरावतीतील घटनांनंतर विश्व हिंदू परिषदेचा मोठा निर्णय; आता गुजरातमध्ये…

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Congress issues notice to 9 mlas who were absent during vote of confidence spb

Next Story
“एकनाथ शिंदे दाखवतील त्या मार्गानं चालणारा मी कार्यकर्ता”, आनंदराव अडसूळांच्या मुलाचं सूचक विधान!
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी