करोनाबाधित रुग्ण इतर जिल्ह्यात आढळून आल्यास किंवा जिल्ह्याबाहेर त्यावर उपचार होत असले तरी आता त्या रुग्णाची नोंद रहिवासी असलेल्या मूळ जिल्ह्यातच केली जात आहे. ऑनलाइन व ऑफलाइनच्या आकडेवारीमधील गोंधळ दूर करण्यासाठी राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये हा बदल करण्यात आला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

करोनाबाधित रुग्ण, मृत्यू व करोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची नोंद जिल्हा, राज्य व राष्ट्रीय स्तरावर घेतली जात आहे. ऑनलाइन पोर्टलवर करोना सांख्यिकीची मोजमाप होते. प्रथम जिल्हापातळीवर ऑफलाइन पद्धतीने नोंद केली जाते. अनेक वेळा जिल्हा व राज्य स्तरावरील आकडेवारीमध्ये तफावत दिसून येते. इतर जिल्ह्यातील रहिवासी रुग्णाचा करोना तपासणी अहवाल सकारात्मक आल्यावर त्याच जिल्ह्यात त्याची नोंद घेतली जात होती. ऑनलाइन पोर्टलवर मात्र संबंधित रुग्ण ज्या जिल्ह्यातील रहिवासी आहे, त्या जिल्ह्यामध्ये नोंद केली जाते. रुग्णाने दिलेला पत्ता किंवा आधार कार्डवर असलेल्या पत्त्यावरूनही नोंद होते. त्यामुळे करोनाबाधितांच्या आकड्यांवरून अनेकवेळा गोंधळ उडाला. करोनाबाधित रुग्णाला उपचारासाठी इतर जिल्ह्यात पाठवल्यावरही हा प्रकार घडला. अनेक जिल्ह्याच्या आकडेवारी जुळत नव्हती.

आणखी वाचा- औरंगाबाद जिल्ह्यातील करोनाबाधितांची संख्या दहा हजारांच्या उंबरठ्यावर

करोनाबाधित रुग्णसंख्येतील गोंधळ दूर करण्यासाठी आता जिल्ह्यांमध्येही ऑनलाइन पोर्टल प्रमाणे आपल्या जिल्ह्यातीलच बाधित रुग्ण, करोनामुक्त व म़ृत्यूची नोंद घेतली जात आहे. अकोला व वाशीम जिल्ह्यात या प्रमाणे बदल करण्यात आला आहे. इतर जिल्ह्याची माहिती संबंधित जिल्ह्याला ऑनलाइन पद्धतीने पाठवण्यात येत आहे. त्यामुळे रुग्ण रहिवासी असलेल्या जिल्ह्यातच त्याची नोंद होत आहे. करोनाबाधितांच्या संख्येतील तफावत दूर करण्यासाठी हा बदल करण्यात आला असला ,तरी यामुळे अनेक जिल्ह्यात आकडेवारीमधील गोंधळ वाढल्याचे दिसून येत आहे.

अगोदरच्या नोंदीचा समावेश
काही दिवसांअगोदरपर्यंत रुग्ण ज्या ठिकाणी पॉझिटिव्ह आढळला, त्याच जिल्ह्यामध्ये स्थानिक पातळीवर त्याची नोंद केली जात होती. करोनाबाधितावर उपचार व करोनाबळीच्या बाबतीमध्येही तोच प्रकार झाला. त्यामुळे अनेक जिल्ह्यांच्या आकडेवारीमध्ये बाहेर जिल्ह्यातील रुग्णांचा समावेश आहे. आता ऑनलाइन प्रमाणे बदल करण्यात आला असला, तरी अगोदर घेतलेली नोंद अनेक जिल्ह्यांच्या आकडेवारीत कायम आहे.

आणखी वाचा- बीड जिल्ह्यात बलात्कारातील आरोपी निघाला करोनाबाधित; पिडीतेसह पोलीसांचीही होणार तपासणी

दोन्ही ठिकाणी नोंद होण्याचा धोका
ऑनलाइन प्रमाणे जिल्हा पातळीवर नोंद घेण्यास सुरूवात करण्यात आली. मात्र, करोनाबाधित आढळून आलेल्या किंवा उपचार सुरू असलेल्या जिल्ह्यात आणि मूळ रहिवासी जिल्ह्यात अशा दोन्ही ठिकाणी नोंद होण्याची शक्यता नाकारत येत नाही. या अगोदर असे प्रकार झाले आहेत.

ऑनलाइन पोर्टलप्रमाणे जिल्ह्यातीलच रुग्णांची नोंद घेतली जात आहे. बाहेरच्या जिल्ह्यातील रुग्ण याठिकाणी बाधित आढळला किंवा उपचारार्थ दाखला आहे, अशा रुग्णांची माहिती संबंधित जिल्ह्याला पाठवली जात आहे, असे अकोलाचे निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे म्हणाले आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Corona patients are now registere in the district of origin attempts to eliminate statistical confusion msr