लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सांगली : वन विभागाच्या हलगर्जीपणामुळे वेळेत उपचार न मिळाल्याने एका मोराचा शनिवारी रात्री वन विभागाच्या कार्यालयात तडफडून मृत्यू झाला. मोराला विषबाधा झाल्याची प्राथमिक माहिती असली तरी अधिकृत कारण अद्याप समोर आलेले नाही.

सांगलीत दुचाकीवरून नेलेल्या त्या मोराचा मृत्यू झाला असून मोरास विषबाधा झाल्याची देखील प्राथमिक माहिती समोर आली आहे. यामुळे वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी दुचाकी वरून नेलेल्या मोराचे प्रकरण अधिक गंभीर बनले आहे.

आणखी वाचा-Monsoon Update: दक्षिण कोकणात पुढील दोन दिवस मुसळधार; हवामान विभागाचा अंदाज 

कुपवाड मधील एका भागात एक मोर बेशुद्ध अवस्थेत पडल्याचे कळताच वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी विभागाची मोठी गाडी तात्काळ उपलब्ध होत नसल्याचे लक्षात येताच दुचाकीवरून वन विभागाच्या कार्यालयात नेण्यात आले.पण दुचाकीवरून बेशुद्ध अवस्थेत असलेल्या मोरास उपचारासाठी नेल्याने आणि याचे दृष्य काही प्राणीमित्रानी चित्रीत केल्याने हा प्रकार समोर आला. यालर सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.

मोर हा राष्ट्रीय प्राणी असताना ,मोरा बाबत कडक कायदे आहेत. असे असताना कर्मचाऱ्यांनी वन विभागाची गाडी तात्काळ उपलब्ध नसल्याने बेशुद्ध मोरास कुपवाड मधील वन विभागाच्या कार्यालयात दुचाकीवरून उपचारास नेले. तथापि शासकीय सुट्टीमुळे अत्यवस्थ मोरावर तातडीने उपचार होऊ शकले नाहीत. रात्री उशिरा उपचार सुरु असतांनाच मोराचा तडफडून मृत्यू झाल्याने वन विभागाचा गलथान कारभार समोर आलाय. त्यामुळे प्राणी मित्रांनी याबाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. दुसरीकडे मोराला नेमकी विषबाधाच झाली की अन्य कोणत्या कारणाने त्याचा मृत्यू झाला हे तपासण्यासाठी मोराच्या पार्थिवाचे शवविच्छेदन करण्यात येणार असल्याचे वनअधिकारी यांनी सांगितले. वैद्यकीय अहवालानंतरच मोराच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Due to laxity of the forest department peacock died mrj