सांगली : पश्चिम घाटासह सांगली जिल्ह्यात पावसाचा जोर मंदावला असला तरी चांदोली धरण पन्नास टक्के भरले असून धरणात १७.२९ टी.एम.सी. पाणीसाठा झाला असल्याचे जलसंपदा विभागातून सांगण्यात आले. धरणाची साठवण क्षमता ३४.४० टी.एम.सी.आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कर्नाटकातील अलमट्टी धरणात ७१.३९ टीएमसी पाणीसाठा झाला असून क्षमतेच्या ५८ टक्के भरले आहे. धरणात ७८ हजार ६६८ क्युसेक प्रती सेकंद पाण्याची आवक आहे. सांगली जिल्ह्यात गेल्या २४ तासांत सरासरी ०.८ मि. मी. पावसाची नोंद झाली असून आटपाडी तालुक्यात सर्वाधिक १६.१ मि. मी. पावसाची नोंद झाली आहे.

हेही वाचा : महानुभाव आणि जैन धर्मियांच्या दक्षिण काशीत फलटण शहरात पालखी सोहळ्याचे मोठे स्वागत

विविध धरणातील पाणीसाठा

कोयना – ३१.६८ टीएमसी
धोम – ४.६३ टीएमसी
कन्हेर – ३.३० टीएमसी
दूधगंगा – ८.६६ टीएमसी
राधानगरी – ३.९७ टीएमसी
तुळशी – १.७५ टीएमसी
कासारी – १.२५ टीएमसी
पाटगांव – २.३७ टीएमसी
धोम बलकवडी – ०.४८ टीएमसी
उरमोडी – १.९९ टीएमसी
तारळी – १.७८ टीएमसी

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In sangli 17 29 tmc water stock available at chandoli dam css