उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कल्याणमध्ये कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला. यावेळी अजित पवार यांनी वयावरून पुन्हा राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार यांना लक्ष्य केलं. सरकारमधील कर्मचारी ५८ व्या वर्षीच निवृत्त होतात. पण, ८४ वय झालं तरी तुम्ही थांबेना, असं बोलत अजित पवारांनी शरद पवारांवर टीका केली होता. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवारांना ‘बापला निवृत्त करायचं नसतं’ म्हणत प्रत्युत्तर दिलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अजित पवार नेमकं काय म्हणाले?

अजित पवार म्हटलं, “जनतेच्या अडचणी सोडावणे आणि बहुजन समाजाच्या कल्याणासाठी आम्ही सरकारमध्ये सामील झालो आहोत. त्यात आपला कुठलाही व्यक्तिगत स्वार्थ नव्हता. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी सांगितलं की, ‘पदाचा वापर सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी करायचा असतो.’ याच शिकवणीतून आपण पुढं चाललो आहे.”

हेही वाचा : “तू कारवाई कर, तेव्हा…”, एकेरी उल्लेख करत जरांगे-पाटलांचं अजित पवारांना आव्हान

“आमच्यात तेवढी धमक आणि ताकद आहे”

“वय झाल्यानंतर थांबायचं असतं. ही वर्षोनुवर्षे चालेली परंपरा आहे. पण, काहीजण ऐकण्यास तयार नाहीत. हट्टीपणा करतात. सरकारमधील कर्मचारी ५८ व्या वर्षीच निवृत्त होतात. काहीजण ६५, ७० आणि ७५ व्या वर्षी निवृत्त होतात. मात्र, ८४ वय झालं तरी तुम्ही थांबेना… अरे काय चाललंय काय… आम्ही आहोत ना काम करायला… कुठं चुकलो तर सांगाना… आमच्यात तेवढी धमक आणि ताकद आहे. पाच ते सहावेळा उपमुख्यमंत्री पद सांभाळलं आहे,” असं सांगत अजित पवारांनी शरद पवारांवर टीकास्र सोडलं होता.

हेही वाचा : पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतुक करत अजित पवारांचं शरद पवारांवर टीकास्र; म्हणाले, “८४ वय झालं तरी…”

“आई-बापाविना घर रिकामं वाटायला लागतं”

यावर बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले, “बापाला कधी निवृत्त करायचं नसतं. बाप हेच घरातील उर्जास्त्रोत असतं. आई-बापाविना घर रिकामं वाटायला लागतं.”

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jitendra awhad reply ajit pawar over sharad pawar edge comment ssa