वाई: महाबळेश्वरमध्ये गो-कार्ट रेसिंग करणं एका २४ वर्षीय महिलेच्या जीवावर बेतलं. महाबळेश्वर येथे गो-कार्टिंग ट्रॅकवर बुक कटिंग करताना वाहनाच्या चाकात ओढणी अडकून गळफास लागून पर्यटक महिलेचा मृत्यू झाला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

महाबळेश्वरमधील वेण्णा लेक परिसरातील नाकीदा येथे एका गो-कार्टिंग ट्रॅकवर बुक कटिंग करताना वाहनाच्या चाकात ओढणी अडकून गळफास लागल्याने मुंबईची महिला पर्यटक ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली.

आणखी वाचा-आषाढी एकादशीच्या शासकीय महापूजेच्या वेळी मुखदर्शन सुरु ठेवा, पालकमंत्री विखे पाटील यांची मंदिर प्रशासनाला सूचना

सना अमीर पेटीवाला २४ वर्षीय ही महिला मिरा रोड मुंबई येथील राहणारी होती. गो-कार्टिंग ट्रॅकवर बुक कटिंग हा साहसी भरधाव छोटी गाडी चालविण्याचा प्रकार करताना या महिलेची गाडीच्या चाकात ओढणी अडकल्याने ती गंभीर जखमी झाली. तिला ताबडतोब महाबळेश्वर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच महिलेचा मृत्यू झाला. या घटनेची नोंद महाबळेश्वर पोलीस ठाण्यात झाली असून अधिक तपास महाबळेश्वर पोलीस करत आहेत. पर्यटनाला येणाऱ्या पर्यटकांनी जीवावर बेतणारे खेळ अथवा दरींत उतरण्याचे प्रकार टाळावेत असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai tourist woman dies in mahabaleshwar during adventure game mrj