सातारा जिल्ह्यात दत्तनगर-कोडोली येथे भावावरील रागातून १० महिन्यांच्या पुतण्याला त्याच्या सख्‍ख्‍या काकाने विहिरीत फेकल्याची धक्कादायक घटना घडली. शनिवारी (६ ऑगस्ट) सकाळी ९ च्या सुमारास हा प्रकार घडला. ही घटना समोर आल्यानंतर नागरिकांमधून तीव्र संताप व्‍यक्‍त केला जात आहे. लहान भावाने मोठ्या भावावरील रागातून हे कृत्य केलं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आरोपीने १० महिन्यांच्या पुतण्याला दुकानात घेऊन जात असल्याचे सांगून घराबाहेर नेले. त्यानंतर सातारा-रहिमतपूर रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत फेकून दिलं. मुलाला विहिरीत टाकल्यानंतर आरोपीने या घटनेची माहिती मोठ्या भावाला फोन करून दिली. यानंतर पीडित कुटुंबाला धक्काच बसला. मुलाला विहिरात टाकल्याचं कळताच पीडित कुटुंबाने तात्काळ पोलिसांना याबाबत माहिती दिली.

घटनेनंतर काही तासांतच आरोपीला अटक

मुलाला विहिरीत टाकल्यानंतर आरोपी भाऊ घटनास्थळावरून पसार झाला. दरम्यान, उंचावरून विहिरात फेकल्याने १० महिन्याच्या मुलाचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर सातारा शहर व एमआयडीसी पोलिसांनी काही तासांतच आरोपीला अटक केली. या घटनेनंतर दत्तनगर- कोडोली येथे खळबळ उडाली. चिमुकल्‍याच्‍या मृत्यूवर परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. लहान भावाच्या या कृत्यावर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

व्हिडीओ पाहा :

हेही वाचा : ठाणे : सततच्या वादाला कंटाळून मुलाने केली वडिलांची हत्या

भावाच्या मुलाला विहिरीत का फेकलं?

सातारा पोलिसांनी भावाच्या १० महिन्याच्या मुलाला विहिरीत फेकून मारणाऱ्या नराधमाला अटक केलं आहे. तपासात आरोपीने आई-वडील मोठ्या भावाचंच कौतूक करायचे. मला वाईट दृष्टीकोनातून बघायचे. या रागातून मुलाला विहिरीत फेकल्याचं म्हटलं आहे, अशी माहिती सातारा शहर पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर यांनी दिली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Murder of 10 month old children of brother after dispute in home in satara rno news pbs