शिवसेना, काँग्रेससोबतच्या युतीवर प्रकाश आंबेडकरांचे मोठे विधान, म्हणाले, "युती करायची असेल तर..." | prakash ambedkar comment on vba alliance with shiv sena congress | Loksatta

शिवसेना, काँग्रेससोबतच्या युतीवर प्रकाश आंबेडकरांचे मोठे विधान, म्हणाले, “युती करायची असेल तर…”

शिवसेना पक्षात उभी फूट पडल्यानंतर राज्यातील राजकीय समीकरणं बदलली आहेत.

शिवसेना, काँग्रेससोबतच्या युतीवर प्रकाश आंबेडकरांचे मोठे विधान, म्हणाले, “युती करायची असेल तर…”
प्रकाश आंबेडकर (संग्रहित फोटो)

शिवसेना पक्षात उभी फूट पडल्यानंतर राज्यातील राजकीय समीकरणं बदलली आहेत. एकनाथ शिंदे गट आणि भाजपा यांनी एकत्र येत राज्यात नव्या सरकारची स्थापना केली आहे. तर उद्धव ठाकरे समर्थक, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्यातील आघाडी अद्याप कायम असून आगामी पोटनिवडणूक, महापालिका निवडणूक तसेच विधानसभा निवडणुकीत ही महाविकास आघाडी कायम राहणार का? हा प्रश्न अनुत्तरीत आहे. असे असताना बंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकार आंबेडकर यांनी काही दिवसांपूर्वी युतीसंदर्भात मोठे विधान केले होते. त्यांनी शिवसेना आणि काँग्रेसशी आम्ही युती करायला तयार आहोत, असे सांगितले होते. याच भूमिकेबद्दल प्रकाश आंबेडकरांनी आता अधिक भाष्य केले आहे. शिवसेना आणि काँग्रेसला आमच्याकडून निरोप गेला आहे. आता त्यांनीच युतीसंदर्भात आपली भूमिका स्पष्ट करायला हवी, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले. ते जालना शहरात पत्रकार परिषदेत बोलत होते.

हेही वाचा >>> बाळासाहेब आणि उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यात नेमका फरक काय? नारायण राणे स्पष्टच बोलले; म्हणाले…

वंचित बाहुजन आघाडीच्या महाराष्ट्र समितीच्या रेखा ठाकूर या अध्यक्षा आहेत. त्यांनी महिन्याभरापूर्वीच काँग्रेस आणि शिवसेनेसोबतच्या युतीसंदर्भात भूमिका घेतली होती. युती करायची असेल तर ती काँग्रेस आणि शिवसेनेसोबत करू. मात्र अद्याप काँग्रेस आणि शिवसेना यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. काँग्रेस आणि शिवसेनेची भूमिका अस्पष्ट आहे. ही भूमिका जोपर्यंत स्पष्ट होत नाही, तोपर्यंत सर्वच पक्ष वेगवेगळे लढतील असे आम्ही गृहीत धरले आहे. आम्ही स्वतंत्रपणे लढण्याच्या तयारीला लागलो आहोत, असे प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा >>> “…मग तू काय काम करणार,” उद्धव ठाकरेंवर नारायण राणेंची खोचक टीका; आजारपणाचाही केला उल्लेख, म्हणाले…

वंचित बहुजन आघाडी काँग्रेस आणि शिवसेनेशी युती करण्यास तयार आहे. तसा प्रस्तावही उभय पक्षांना पाठवण्यात आला आहे. मात्र वंचित बहुजन आघाडी राष्ट्रवादीशी जुळवून घेण्यास तयार नाही. त्यामागे नेमके कारण काय आहे? असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. याबाबत विचारले असता प्रकाश आंबेडकरांनी थेट बोलणे टाळले आहे. आम्ही आमच्याकडून निरोप पाठवलेला आहे. आता त्यांनी या निरोपाला उत्तर देण्याची गरज आहे. राष्ट्रवादीशी युती करण्यास आम्ही तयार का नाही? याचे उत्तर योग्य वेळी देऊ, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
दसरा मेळाव्यातील भाषणावरून केसरकरांचे उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र, म्हणाले “डुक्कर संजय राऊतांच्या तोंडी…”

संबंधित बातम्या

“मंत्रिपद चुलीत घाला” नाराजीनाट्यानंतर बच्चू कडूंचं मोठं विधान; म्हणाले, “नवीन सुखाची पाऊलवाट…”
मोठी बातमी: अवघ्या दोन महिन्यातच तुकाराम मुंढेंची बदली
मुंबई महापालिका निवडणुकीत मनसे भाजपाशी युती करणार? राज ठाकरेंनी दिलं उत्तर, म्हणाले…
“…भगतसिंह कोश्यारींचं अजूनही लग्न झालं नाही”, ‘त्या’ विधानावरून राज ठाकरेंची टोलेबाजी!
“…त्याचा मी पुरावा आणला आहे”, म्हणत आदित्य ठाकरेंनी पत्रकार परिषदेत ‘ते’ पत्रच वाचून दाखवलं!

व्हिडिओ

ताज्या बातम्या
क्रूर! पॉर्न पाहून अल्पवयीन मुलाचा १० वर्षीय मुलीवर बलात्कार; नंतर गळा आवळून खून
Mumbai Fire : गोरेगाव आयटी पार्कमागील जंगलात भीषण आग
राजधानी हादरली: दिल्लीत २.५ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप
पुणे: द्रुतगती मार्गावर अपघात रोखण्यासाठी ‘सुरक्षा’ मोहीम; जनजागृतीसाठी २४ तास गस्त, प्रादेशिक परिवहन विभागाची १२ पथके
पुणे: सात हजार ३०० पेक्षा अधिक पदांसाठी ४ डिसेंबरला विभागीय महारोजगार मेळावा