सांगली जिल्ह्यातील काँग्रेसचे मोठे नेते आणि प्रदेश सरचिटणीस सत्यजित देशमुख यांच्या रुपात अजून एक मोठा नेता भाजपाच्या गळाला लागण्याची शक्यता आहे. सत्यजित देशमुख यांच्या भाजपाप्रवेशाची सध्या जोरदार चर्चा सुरू असून ते सोमवारी महाजनादेश यात्रेदरम्यान भाजपामध्ये प्रवेश करतील अशी सूत्रांची माहिती आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सत्यजित देशमुख यांनी आगामी वाटचालीबाबत निर्णय घेण्यासाठी आज शिराळा येथे कार्यकर्त्यांचा विशेष जनसंवाद मेळावा आयोजित केल्याची माहिती आहे. त्यानंतर, सोमवारी ते महाजनादेश यात्रेदरम्यान भाजपामध्ये प्रवेश करतील असं सांगितलं जात आहे. विधान परिषदेचे माजी सभापती व सत्यजित देशमुख यांचे वडील शिवाजीराव देशमुख यांच्या निधनानंतर विधान परिषदेची जागा रिक्त झाली होती. तेव्हापासून सत्यजित यांनी भाजपामध्ये घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.  भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची सत्यजित देशमुख यांच्याशी बोलणी सुरू असून त्यांना भाजपकडून शिराळा विधानसभा मतदारसंघातून लढवले जाऊ शकते.

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेचे सोमवारी सांगली जिल्ह्यात आगमन होणार आहे. परिणामी आज(दि.15) आयोजित केलेल्या जनसंवाद मेळाव्यात देशमुख काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. जर, देशमुख यांनी भाजपात जाण्याचा निर्णय घेतला तर, तो काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जात असून सांगलीत मोठा राजकीय भूकंप असेल असं म्हटलं जात आहे. परिणामी, काँग्रेसमध्ये चिंतेचं वातावरण आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sangli congress leader satyajit deshmukh may join bjp sas