१. भारत-पाक शांती चर्चेसाठी इम्रान खान यांचे पंतप्रधान मोदींना पत्र
भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमधली शांती चर्चा पुन्हा सुरू व्हावी यासाठी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिल्याचे समजते आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज आणि पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरैशी यांच्यात बैठक व्हावी यासाठी इम्रान खान यांनी संयुक्त राष्ट्रांकडे शब्द टाकल्याचेही वृत्त आहे. न्यूयॉर्कमध्ये पुढील महिन्यात संयुक्त राष्ट्रांची सर्वसाधारण बैठक होणार आहे. या बैठकीत सुषमा स्वराज यांनी कुरैशी यांचीही भेट घ्यावी यासाठी इम्रान खान आग्रही असल्याचे समजते आहे. वाचा सविस्तर :

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

२. अयोध्येत राम मंदिर निर्माणाचाही अध्यादेशही सरकारने काढावा-शिवसेना
तिहेरी तलाक हा देशात गुन्हा ठरवण्यात आला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी या अध्यादेशाला मंजुरी दिल्याने मुस्लिम समाजातील अनिष्ट रुढीला कायदेशीरदृष्ट्या तिलांजली देण्यात एक पाऊल पुढे पडले असे म्हणता येईल. आता केंद्र सरकारने अयोध्येत राम मंदिर निर्माणाचाही अध्यादेश काढावा असा सल्ला शिवसेनेने दिला आहे. तीन दशकांपासून बाजूला टाकलेले राम मंदिर निर्मितीचे आश्वासन गाठोड्यातून बाहेर काढा. अयोध्येतील राम मंदिराचाही अध्यादेश काढा आणि हिंदूंना दिलेल्या एका वचनाची पूर्तता करा असेही शिवसेनेने म्हटले आहे. सामनाच्या अग्रलेखात ही टीका करण्यात आली आहे. वाचा सविस्तर : 

३. लैंगिक अत्याचारातील गुन्हेगारांची राष्ट्रीय पातळीवर नोंद
देशभरातील लैंगिक अत्याचारातील गुन्हेगारांवर यापुढे करडी नजर राहणार आहे. गुरुवारपासून लैंगिक गुन्हेगारांची राष्ट्रीय पातळीवर नोंद ठेवली जाणार असून, त्यांची अशा प्रकारे सविस्तर नोंद ठेवणारा भारत जगातील नववा देश ठरणार आहे. वाचा सविस्तर :

४. ‘बीएसएफ’च्या पाच अधिकाऱ्यांवर हत्येचा गुन्हा
वाशीम जिल्हय़ातील कारंजा लाड येथील सीमा सुरक्षा दलाचे जवान सुनील धोपे यांच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी सीमा सुरक्षा दलाचे पाच अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारंजा पोलीस ठाण्यात बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, तिसऱ्या दिवशीही धोपे कुटुंबीय आपल्या भूमिकेवर ठाम असून, त्यांनी पार्थिव स्वीकारण्यास स्पष्ट शब्दात नकार दिला. वाचा सविस्तर :

५. मलेशियाचे माजी पंतप्रधान नजीब रझ्झाक यांना अटक
मलेशियाचे माजी पंतप्रधान नजीब रझ्झाक यांना बुधवारी कोटय़वधी डॉलर्सच्या भ्रष्टाचार प्रकरणी तेथील भ्रष्टाचार विरोधी संस्थेने अटक केली आहे. आता त्यांच्यावर न्यायालयात आरोपपत्र ठेवण्यात येणार आहेत. भ्रष्टाचार विरोधी संस्थेने सांगितले, की नजीब यांना त्यांच्या कार्यालयातच अटक करण्यात आली असून, त्यांना गुरुवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. वाचा सविस्तर:

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Top five morning news bulletin pakistan pm imran khan writes to pm modi calls for resumption of peace dialogue