लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सांगली : लग्नानिमित्त सुरु असणाऱ्या नाचगाण्यावेळी हवेत केलेल्या गोळीबारात एक तरुण गंभीर जखमी झाल्याची घटना भाटशिरगाव (ता. शिराळा) येथील देसाई वस्तीवर घडली. जखमी तरुणावर कोल्हापुरातील सीपीआर शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

अवधूत देसाई यांच्या लग्नानिमित्त रात्री नाचगाण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी ॠषी इंगळे, अजय इंगळे, सनी गायकवाड हे देसाई वस्तीवर गेले होते. यावेळी ओंकार देसाई याने रिव्हॉल्व्हरमधून हवेत गोळीबार केला. यातील गोळी ॠषी देसाई यांच्या डाव्या दंडात घुसली. यामुळे तो गंभीर जखमी झाला.

या प्रकरणी ओंकार देसाई व संजय देसाई फौजी या दोघांना अटक करण्यात आली आहे. सदरचे रिव्हॉल्व्हर देसाई फौजीचे होते.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Young man injured in firing during wedding dance mrj