बॉलिवूड कपल्सबद्दल त्यांच्या चाहत्यांमध्ये नेहमीच उत्सुकता दिसते. ते काय करतात?, त्यांच्यात आपल्यासारखीच भांडणं होतात का? असे अनेक प्रश्न चाहत्यांच्या मनात असतात. पण आता ऐश्वर्या आणि अभिषेकवरून बॉलिवूड कपल्सही सर्वसामान्य जोडप्यांसारखेच भांडतात हे सिद्ध झालं आहे. त्याचे झाले असे की, ऐश्वर्याच्या ‘सरबजीत’ सिनेमाच्या रेड कार्पेट सोहळ्यात संपूर्ण बच्चन कुटुंबिय आले होते. यावेळी ऐश्वर्याने पती अभिषेक बच्चनसोबत रेड कार्पेटवर दिमाखदार एण्ट्री घेतली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पण नेहमीसारखी त्यांची ही एण्ट्री नव्हती. ऐश्वर्यासोबत रेड कार्पेटवर येताना अभिषेकचा चेहरा उतरलेला होता. तर ऐश्वर्या सर्वांना हसून भेटत होती. प्रसारमाध्यमांना ऐश्वर्या फोटो देत असताना अभिषेक एकटाच एका कोपऱ्यात शांत उभा होता. संपूर्ण बच्चन कुटुंबियांसोबत ऐश्वर्याचे आई- वडिलही या सोहळ्याला उपस्थित होते.

छायाचित्रकारांनी अभिषेक आणि ऐश्वर्याला एकत्र फोटो देण्याची विनंती केली. ऐश्वर्या त्याला हाका मारत असताना अभिषेकने तिचा आवाज ऐकून न ऐकल्यासारखं केलं. तेव्हा ऐश्वर्याने आपल्या वडिलांना त्याला घेऊन यायला सांगितले. छायाचित्रकारही त्याला हाका मारत होते, तेव्हा कुठे अभिषेक फोटो काढायला तयार झाला. लेहरे टीव्हीने त्यांच्या युट्युब चॅनलवर हा व्हिडिओ शेअर केला आहे.

पण हे प्रकरण इतक्यावरच थांबले नाही तर छायाचित्रकारांनी त्या दोघांना प्रोफाईल फोटो द्यायला सांगितले. तेव्हा मात्र अभिषेकला याचा राग आला आणि ऐश्वर्याचेच फोटो घ्या असं सांगून तिथून निघून गेला. त्याचं हे वागणं पाहून ऐश्वर्याचा चेहराच उतरला. तिनेही हात जोडून प्रसारमाध्यमांना धन्यवाद देत तेथून निघून जाणे योग्य समजले.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aishwarya rai bachchan sarabjit red carpet event abhishek bachchan treated bad to aishwarya rai bachchan