छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री हृता दुर्गुळे ही नुकतीच लग्नबंधनात अडकली आहे. हृताने नुकतंच दिग्दर्शक प्रतीक शाहसोबत लग्नगाठ बांधली. अगदी मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत १८ मे रोजी मुंबईत त्या दोघांचा विवाहसोहळा पार पडला. हृताच्या या विवाहसोहळ्याला अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. मात्र या विवाहसोहळ्यात ‘मन उडू उडू झालं’ या मालिकेतील इंद्रा म्हणजेच अभिनेता अजिंक्य राऊत कुठेही दिसला नाही. तसेच या मालिकेतील कोणताही कलाकार हृताच्या लग्नात दिसले नाहीत. यामुळे अनेकांना प्रश्न पडला होता. नुकतंच अजिंक्य राऊतने याबाबत स्पष्टीकरण दिले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अजिंक्यने नुकतंच एका न्यूज पोर्टलला मुलाखत दिली. या मुलाखतीदरम्यान त्याला याबाबतचा एक प्रश्न विचारण्यात आला होता. यावर बोलताना तो म्हणाला, “हृताच्या लग्नादिवशी मी परभणीला होतो. माझ्या आई वडिलांचा लग्नाचा वाढदिवस होता. त्यामुळे मी परभणीला गेलो. या कारणामुळे मला लग्नाला येता आलं नाही.”

साडी, चंद्रकोर अन् नाकात नथ; सचिन तेंडुलकरच्या लेकीचा मराठमोळ्या लूकमधील फोटो व्हायरल

“तू हृताच्या साखरपुड्याला गेला होतास, त्यामुळे आता आई-वडिलांच्या लग्नाच्या वाढदिवसाला चल, असं माझी बहिण मला सहज म्हणाली होती. पण मी गावी गेल्यावर माझे आई बाबा माझ्यावर फार रागावले. ती तुझी सहकलाकार आहे. तू तिच्या लग्नाला जायला हवं होतंस, अस ते मला म्हणाले. मी हृताच्या लग्नासाठी १५-१६ मे रोजी सुट्टी घेतली होती. त्यानंतर १७ मे रोजी मी मुंबईत येऊन १८ मे रोजी लग्नाला येणार होतो.”

“पण मालिकेच्या प्रोडक्शन हाऊसकडून माझ्या सुट्ट्या पुढे ढकलल्या गेल्यामुळे मला लग्नाला हजर राहता आले नाही. याबाबत मी हृताला फोन करुन सांगितले होते. त्यावेळी हृता मला म्हणाली, ‘अजिंक्य काहीच हरकत नाही, तू तुझ्या आई वडिलांसोबत वाढदिवस साजरा कर’. मात्र तिच्या सासूबाई माझ्यावर चिडल्या.”

‘तारक मेहता…’ मालिकेत परतण्यासाठी दयाबेन सज्ज, निर्माते म्हणाले “आम्ही योग्य वेळेची…”

“माझी आणि हृताची मैत्री फार घट्ट आहे. तिचा नवरा आणि सासूसोबतही माझे फार चांगले संबंध आहेत. पण मी लग्नाला न आल्यामुळे त्या माझ्यावर फार रागवल्या आहेत. तू लग्नाला आला नाहीस, तर आता ओळख दाखवायलाही येऊ नको, असा त्या गंमतीत म्हणाल्या. पण मी त्यांना हे सर्व सांगितल्यावर त्यांचा माझ्यावरील राग निवळला”, असं देखील अजिंक्यने मुलाखतीदरम्यान सांगितले.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ajinkya raut absent in hruta durgule wedding prateek shah mother angry nrp