अभिनेत्री आलिया भट्ट आणि कतरिना कैफ यांच्या मैत्रीची चर्चा कलाविश्वात आणि प्रसारमाध्यमांमध्ये कायमच असते. बऱ्याच कार्यक्रमांमध्ये, पार्ट्यांमध्ये या दोघी एकत्र पाहायला मिळतात. नेहा धुपियाच्या चॅट शोमध्ये कतरिना- आलियाने एकत्र हजेरी लावली. तेव्हासुद्धा त्यांच्यातल्या घनिष्ठ मैत्रीचा प्रत्यय आला होता. मात्र, आता एका व्यक्तीमुळे या दोघींच्या मैत्रीत फूट पडल्याची जोरदार चर्चा आहे. ती व्यक्ती म्हणजे कतरिना कैफचा पूर्वाश्रमीचा प्रियकर रणबीर कपूर.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रणबीर कपूरमुळेच आलिया- कॅट यांच्या मैत्रीत वितुष्ट आल्याचं समजतंय. रणबीर आणि आलिया आगामी ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटात एकत्र झळकणार आहे. गेल्या काही दिवसांपासून दोघंही सध्या त्याच शूटिंगमध्ये व्यग्र आहेत. नुकतीच आलिया शूटिंग संपवून भारतात परतली आहे. पण रणबीर अजूनही लंडनमध्येच आहे. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान रणबीर आणि आलियामध्ये जवळीक वाढल्याची चर्चा असून कतरिनाला हीच गोष्ट खटकत आहे.

वाचा : गणेश आचार्यचा इडली खाण्याचा रेकॉर्ड तुम्ही मोडू शकाल का?

शूटिंगदरम्यान चित्रपटाशी निगडीत प्रत्येक जण रणबीर- आलियाच्या अफेअरबाबत चर्चा करत आहे आणि ही चर्चा कतरिनापर्यंत पोहोचली आहे. त्यामुळेच ती नाराज झाल्याचं म्हटलं जात आहे. आपल्या पूर्वाश्रमीच्या प्रियकरासोबत जिवलग मैत्रिणीची वाढती जवळीक तिला खटकत आहे. म्हणूनच आता कतरिना- आलियाच्या मैत्रीत कटुता आल्याचं समजतंय.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Alia bhatt closeness with ranbir kapoor costs her friendship with katrina kaif