बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचा ‘सूर्यवंशम’ हा चित्रपट प्रदर्शित होऊन तब्बल १७ वर्ष पूर्ण झाली आहेत. सोशल मिडीयावर या चित्रपटासंदर्भात अनेकदा मजेशीर प्रतिक्रियांचा पाऊस पडताना दिसतो. आजही ट्विटरवर त्याचा प्रत्यय आला. आज #17YearsOfSooryavansham हा हॅशटॅग ट्विटरवर ट्रेण्डिंग असून बिग बी यांनीही ट्विट करून या चित्रपटाबद्दलच्या आठवणी जागवल्या आहेत. सेट मॅक्स या वाहिनीवर सूर्यवंशम अनेक वेळा दाखवला जातो. यावरुन सोशल मीडियावर बरेच जोक्स व्हायरल झाले आहेत. ‘सूर्यवंशम’च्या १७ व्या वर्षपूर्तीनिमित्त ट्विटरकरांची सर्जनशीलता अक्षरश: ओसंडून वाहताना दिसत आहे. ई. व्ही. व्ही. सत्यनारायण दिग्दर्शित या चित्रपटात अमिताभ यांनी हिरा ठाकूर ही व्यक्तिरेखा साकारली होती. १९९७मध्ये रिलीज झालेल्या ‘सूर्यवंशम’ याच नावाच्या तामिळ चित्रपटाचा हा हिंदी रिमेक होता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा


मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amitabh bachchan sooryavansham completed 17 years