फडणवीसांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर अमृता फडणवीसांची पहिली पोस्ट, म्हणाल्या…

देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधीनंतर अमृता फडणवीस यांचं ट्वीट चर्चेत आहे.

amruta fadnavis, amruta fadnavis tweet, devendra fadnavis deputy cm, Eknath Shinde, Maharashtra CM, Eknath Shinde live updates, Eknath Shinde new cm of maharashtra, devendra fadnavis, cm eknath shinde, maharashtra new cm, maharashtra new cm eknath shinde, Eknath Shinde oath ceremony, Maharashtra New CM Eknath Shinde Oath Ceremony,एकनाथ शिंदे, एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री, महाराष्ट्राचे नवीन मुख्यमंत्री, महाराष्ट्राचे नवीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, एकनाथ शिंदे शपथविधी, एकनाथ शिंदे शपथविधी सोहळा, महाराष्ट्राचे नवीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शपथविधी, देवेंद्र फडणवीस, देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे, भाजप , शिवसेना, महाराष्ट लेटेस्ट मराठी न्यूज, अमृता फडणवीस, अमृता फडणवीस ट्वीट, देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर त्यांची पत्नी अमृता फडणवीस यांची सोशल मीडिया पोस्ट चर्चेत आहे.

राज्यात गेल्या दहा दिवसांपासून सुरू असलेल्या सत्तानाट्यावर अखेर पडदा पडला आहे. अंतिम टप्प्यात भाजपने धक्कातंत्राचा अवलंब करत मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे विराजमान झाले. तर उपमुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. गुरुवारी संध्याकाळी राजभवनात हा शपथविधी पार पडला. शिंदे यांना मुख्यमंत्रीपद देऊन शिवसेनेवर त्यांचे वर्चस्व प्रस्थापित करण्याचा भाजपचा उद्देश स्पष्ट झाल्याचे बोललं जात आहे. देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांची पत्नी अमृता फडणवीस यांची सोशल मीडिया पोस्ट चर्चेत आहे.

अमृता फडणवीस सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतात. कोणत्याही राजकीय आणि सामाजिक विषयावर त्या बिनधास्त आपलं मत व्यक्त करताना दिसतात. देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर अमृता यांनी पहिल्यांदाच ट्वीट केलं आहे. त्यांनी आपल्या ट्वीटमधून नवे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी लिहिलं, “महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मनःपूर्वक शुभेच्छा!”

याशिवाय काही दिवसांपूर्वीच अमृता फडणवीस यांनी लंडनच्या हिंदू मंदिरात खास पूजा केली होती. ज्याचे काही फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले होते. त्यांची ही पोस्ट त्यावेळी सोशल मीडियावर बरीच चर्चेत होती. त्यांनी लिहिलं होतं. “नमस्कार लंडन, लंडनला उतरले आणि तिथल्या स्वामीनारायण हिंदू मंदिराला भेट दिली आणि विशेष पूजा केली. परदेशातील पहिले सर्वात मोठे हिंदू मंदिर! महाराष्ट्राच्या स्थैर्यासाठी आणि समृद्धीसाठी प्रार्थना केली. लोकशाहीचा मंत्र आपण कधीही विसरू नये; जनता सर्वात आधी, नंतर पक्ष आणि शेवटी आपण स्वत:”

दरम्यान स्वत:च्या भूमिकेबद्दल बोलताना फडणवीस यांनी, “मी सरकारच्या बाहेर राहून काम करणार आहे. हे सरकार नीट काम करेल याची जबाबदारी माझीही असेल” असं म्हटलं आहे. “या सरकारला यशस्वी करण्यासाठी जे जे आवश्यक आहे ते करण्यासाठी आम्ही एकत्र प्रयत्न करु. पंतप्रधान मोदींनी जे विकासपर्व सुरु केलं आहे ते आम्ही राबवू. मागील अडीच वर्षांपासून जो महाराष्ट्राच्या विकासाला ब्रेक लागला होता. तो निघेल आणि पुन्हा विकासाची एक्सप्रेस धावू लागेल,” असंही फडणवीस म्हणाले.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Amruta fadnavis tweet after devendra fadnavis become deputy cm mrj

Next Story
प्रसाद ओकने दिल्या महाराष्ट्राच्या नव्या मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा, ‘धर्मवीर’मधील खास फोटो शेअर करत म्हणाला…
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी