मराठीमध्ये एकापोठापाठ एक ऐतिहासिक चित्रपट प्रदर्शित होत आहेत. अशामध्येच आता अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी नव्या ऐतिहासिक चित्रपटाची घोषणा केली. ‘गरुडझेप’ असं या चित्रपटाचं नाव आहे. या चित्रपटाच्या टीझरला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला. त्यापाठोपाठ प्रदर्शित झालेले या चित्रपटातील ‘बम बम भोले’ हे गाणेही प्रेक्षकांच्या पसंतीस पडले. प्रेक्षकांच्या मिळालेल्या या उत्तम प्रतिसादानंतर या चित्रपटातील आणखीन एक गाणे प्रदर्शित झाले आहे.
हेही वाचा : अभिनेत्री केतकी चितळेचे फेसबुकवर पुनरागमन, पोस्टने पुन्हा वेधले नेटकऱ्यांचे लक्ष
‘जय भवानी जय शिवराय’ असे या गाण्याचे नाव आहे. अभिनेते अमोल कोल्हे यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे याबाबत माहिती दिली. या गाण्यामध्ये अमोल कोल्हे यांची झलक पाहायला मिळत आहे. तसेच या चित्रपटाचे काही बिहाइंड द सीन्सही पाहायला मिळत आहेत. या चित्रपटाची उत्सुकता वाढवणाऱ्या या गाण्याला प्रेक्षकांची पसंती मिळताना दिसत आहे. या गाण्यामधील अमोल कोल्हे यांचा लूक विशेष लक्षवेधी ठरत आहे.
पहा गाण्याचा व्हिडिओ :
“गणेशोत्सवाची गणेशभक्तांना शिवशक्तीमय भेट…सादर आहे शिवप्रताप गरुडझेप या आगामी चित्रपटातील ‘जय भवानी जय शिवराय’ गाणे!” सं अमोल कोल्हे यांनी गाणं शेअर करताना म्हटलं आहे. या गाण्याचे बोल हृषिकेश परांजपे यांनी लिहिले असून गायक आदर्श शिंदेच्या ठसकेबाज आवाजात ते स्वरबद्ध करण्यात आलं आहे. शशांक पोवार यांनी या गाण्याला संगीतबद्ध केलं आहे.
आणखी वाचा : ‘वडापावच कोणेकाळी आधार होता…’ अभिनेते अमोल कोल्हेंनी जागवल्या स्ट्रगलच्या दिवसांच्या आठवणी
जगदंब क्रिएशन्स प्रस्तुत या चित्रपटाची निर्मिती स्वतः अमोल कोल्हे यांनीच केली आहे. तसेच चित्रपटाचे दिग्दर्शन कार्तिक राजाराम केंढे यांनी केले आहे. विजयादशमीच्या मुहुर्तावर ५ ऑक्टोबरला ‘शिवप्रताप-गरुडझेप’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येईल.