अभिनय आणि संगीत या दोन्ही क्षेत्रात आपल्या दर्जेदार कामगीरीचा ठसा उमटवणाऱ्या बेला थॉर्नने आता आपले लक्ष पॉर्न चित्रपटांच्या दिशेने वळवले आहे. ती पॉर्नहब या प्रसिद्ध पॉर्न वेबसाईटसाठी चित्रपट दिग्दर्शीत करणार आहे. हा चित्रपट विल्यम शेक्सपियर यांच्या रोमिओ – ज्यूलिएट या कादंबरीवर आधारित असून याचे चित्रीकरण लवकरच जर्मनीमध्ये सुरु होईल, अशी माहिती पॉर्न हबचे सर्वेसर्वा कोरी प्राईज (Corey Price) यांनी दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आर्थिक संकटात असलेल्या अनेक अयशस्वी अभिनेत्री आपली महागडी जीवनशैली सांभाळण्यासाठी पॉर्न सिनेसृष्टीच्या आसऱ्यास येतात असा आजवरचा इतिहास आहे. परंतु बेला थॉर्न हॉलिवूड सिनेसृष्टीतील सर्वात जास्त मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी आहे त्यामुळे तिचे पॉर्न सिनेसृष्टीत झालेले पदार्पण पाहून अनेकांचा आश्चर्याचा धक्का बसला आहे.

बेला थॉर्नच्या मते प्रत्येक गोष्ट पैसे कमावण्यासाठी केली जात नाही. तिने आजवर अॅनिमेशन, विनोदी, थरारपट, भयपट अशा सर्व प्रकारच्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. आता तिला वेगळ्या प्रकारच्या चित्रपटामध्ये काम करायचे आहे. त्यामुळे तिने आता पॉर्न चित्रपटांच्या दिशेने आपला मोर्चा वळवला आहे. याआधी सिलवेस्टर स्टेलॉन, जॅकी चॅन, कॅमेरॉन डायझ, आर्नोल्ड श्वार्झनेगर यांसारख्या अनेक मोठ्या हॉलिवूड कलाकारांनी पॉर्न सिनेमांमध्ये काम केले आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bella thorne pornhub porn movie mpg