‘बिग बॉस’च्या ११ व्या पर्वात सर्वांत स्टायलिस्ट स्पर्धक म्हणून हिना खानकडे पाहिले जाते. तिने या संपूर्ण पर्वात एकदा वापरलेले कपडे पुन्हा वापरले नाहीत. प्रत्येक दिवशी नव्या ड्रेसमध्ये दिसणाऱ्या हिनावर एका डिझायनरने त्याच्याकडून मागून घेतलेले कपडेच हिना घालते असा आरोप केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हिनाच्या या वागणुकीवर नीरुशा निखत नावाच्या डिझायनरने एक ट्विट केले आहे. अभिनेता रोहन मेहरा जेव्हा बिग बॉसच्या घरी पाहुणा म्हणून गेला होता, तेव्हा त्याने हिनाला स्टाइल आयकॉन असे संबोधले होते. त्याच्या याच बोलण्यावर ट्विट करत नीरुशाने म्हटले की, ‘प्रिय रोहन मेहरा हिना खान स्टाइल आयकॉन, १५० नाइट सूट, ५० जोडी चपला आणि १०० ड्रेस… छानच.. लोकांकडे कपडे मागून तर कोणीही आयकॉन होईल. मी तिला माझे कपडे देण्यास नकार दिला याचा मला अजिबात पश्चाताप होत नाही.’

गेल्या आठवड्यात शोमध्ये स्पर्धकांच्या घरातलेही त्यांना भेटायला आले होते. ये रिश्ता क्या केहलाता है मालिकेत हिनासोबत काम करणारा रोहनही आला होता. त्याने हिनाच्या कपड्यांचे कौतुक करत तीच इथली खरी स्टाइल आयकॉन आहे असे सांगितले होते. पण त्याने केलेलं हे कौतुक निरूशाला फारसं रुचलं नाही आणि तिने तिच्या भावना ट्विटरवर व्यक्त केल्या. तसेच हिना बिग बॉसमध्ये मागितलेले कपडे वापरते असाही आरोप केला.

असे म्हटले जाते की, या शोमध्ये प्रवेश करण्यापूर्वीच हिनाने अनेक डिझायर्सना मेसेज करुन त्यांच्याकडून कपडे वापरुन परत देण्याबद्दल बोलली होती. रिपोर्ट्सनुसार, हिनाचा हा मेसेज डिझायनर निरूशालाही गेला होता. पण तिने डिझाइन केलेले कपडे देण्यास स्पष्ट नकार दिला होता.

हिना खानची स्टायलिस्ट हेमलता पेरिवालही ती दरदिवशी सुंदर दिसेल याकडे लक्ष ठेवून आहे. पण आता हिना वापरत असलेले ड्रेस हे परताव्याच्या अटीवर घेतलेले आहेत. त्यामुळेच हिनाच्या सोशल मीडिया अकाऊंटवर तिने वापरलेल्या सगळ्या ड्रेसचे फोटो शेअर करण्यात येतात. तसेच तिने वापरलेला प्रत्येक ड्रेस आणि दागिने कोणत्या ब्रॅण्डचे आहेत त्याचीही माहिती देण्यात येते.

गेल्या आठवड्यात सलमान खान आणि विकास गुप्ता यांनी तिच्या ड्रेसबद्दल बोलताना म्हटले होते की, हिना एकदा वापरलेले कपडे दुसऱ्यांदा वापरत नाही.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bigg boss 11 shocking revelation about hina khan borrow dresses in this show designer alleagation on twitter