बॉलिवूड अभिनेत्री बिपाशा बासूने तिचा ३९ वा वाढदिवस साजरा केला. बिपाशाच्या वाढदिवसाला बॉलिवूड जगतातील अनेकांनी तिला आवर्जुन शुभेच्छा दिल्या. यात तिच्या पूर्वीश्रमीच्या प्रियकराचाही समावेश आहे. मॉडेल- अभिनेता डिनो मोरियाने तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. एकेकाळी बिपाशाच्या फार जवळच्या मित्रांमध्ये ज्याची गणती केली जायची त्यात दिनोचे नाव आवर्जुन असायचे. दिनोने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन बिपाशासोबतचा फार जुना फोटो शेअर करत तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.’माझी सर्वात चांगली मैत्रीण बिपाशाला वाढदिवसाच्या खुप साऱ्या शुभेच्छा. तू सतत आनंदी राहा. तुला खूप सारं प्रेम. आपला हा फोटो फार जुना आहे,’ असा मेसेजही त्याने लिहिला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दिनोचा हा मेसेज हेच दाखवून देतो की ब्रेकअपनंतरही दोघांनी आपले मैत्रीचे नाते कधी तुटू दिले नाही. तसेच बिपाशाचा पूर्वाश्रमिचा प्रियकर असूनही बिपाशाच्या लग्नाच्या सर्व कार्यक्रमांना दिनो आवर्जुन उपस्थित होता. १९९६ ते २००० पर्यंत बिपाशा आणि दिनो हे रिलेशनशिपमध्ये होते. या दोघांची पहिली ओळख ‘राज’ सिनेमाच्या सेटवर झाली होती. चित्रीकरणादरम्यानच त्यांच्यात मैत्री झाली आणि मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले.

https://twitter.com/DinoMorea9/status/949913923561570304

दोघांनी कधीही त्यांच्यात असणारे प्रेमाचे नाते मान्य केले नसले तरी २०१५ मध्ये एका मुलाखतीत दिनो म्हणाला होता की, ‘आम्ही दोघंही स्वतःचे निर्णय घेण्यास सक्षम होतो. त्यामुळे आम्हाला जे योग्य वाटलं ते आम्ही केलं. आमची पहिली डेट मुंबईमध्ये होती.’ बिपाशा आणि दिनो यांनी ‘राज’व्यतिरिक्त ‘गुनाह’, ‘इश्क है तुमसे’ आणि ‘चेहरा’ या सिनेमांत एकत्र काम केले आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bipasha basu ex boyfriend dino morea shares picture with her on twitter